Maharashtra Political News Headlines 13 August 2024 : ठाकरे सरकारने घेतलेले दोन निर्णय मागे घ्या, शरद पवार गटाच्याच माजी खासदाराची मागणी
TV9 Marathi, Maharashtra Political News Live 13 August 2024 : आज 13 ऑगस्ट 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यामुळे सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या विविध पक्षांच्या बैठका, दौरे आणि रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अनेक पक्षात इनकमिंग-आऊटगोईंग सुरु झाले आहे. त्यासोबतच आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकमध्ये शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. मराठा आरक्षण शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
“महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या दोन निर्णयांचा फेरविचार करा’
महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या दोन निर्णयांचा फेरविचार करा, अशी मागणी शरद पवार गटाच्या माजी खासदार वंदना चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात पुण्यासाठी वाढीव एफएसआय देण्याचा तर ॲमेनिटी स्पेस कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे दोन्ही निर्णय पुण्यासाठी घातक ठरणारे आहेत. गेल्या महिन्यात पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे यावर शिक्कामोर्तब झाले, ठाकरे सरकारने घेतलेल्या या दोन्ही निर्णयांचा फेरविचार करावा, अशी मागणी वंदना चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
-
Vinesh Phogat Decision Live Updates: विनेश फोगाटला तारीख पे तारीख! निकाल आता 16 ऑगस्टला
विनेश फोगाट बाबतचा निर्णय लांबणीवर गेला आहे. आता 16 ऑगस्टला रात्री साडेनऊ वाजता येणार निर्णय येणार आहे. ऑलम्पिक मधील अपात्रतेनंतर येणाऱ्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
-
-
Vinesh Phogat Decision Live Updates: विनेश फोगाटच्या पदकाचा निकाल थोड्याच वेळात
जागतिक कुस्तीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस असणार आहे. आतापासून थोड्याच वेळात, पॅरिसमधील कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) भारताची अनुभवी कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपीलवर निर्णय देईल. वजन जास्त असल्याचं कारण सांगत विनेशला अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरवण्यात आले आणि तिचे पदक हुकले. याविरोधात विनेशने अपील केले असून आता यावर निर्णय घ्यावा लागणार आहे.
-
17 ऑगस्ट रोजी भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक
17 ऑगस्ट रोजी दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भाजपाचे सर्व प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश संघटन मंत्रीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
-
बंगालमध्ये ईडीच्या समन्सविरोधातील याचिकेवर सुनावणी पूर्ण
पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या समन्सविरोधातील याचिकेवरील सुनावणी पूर्ण करताना सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने निर्णय राखून ठेवला आहे.
-
-
काँग्रेस 22 ऑगस्ट रोजी देशभरातील ईडी कार्यालयांना घेराव घालणार
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि खासदार केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, 22 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात एक मोठे राष्ट्रीय स्तरावरील आंदोलन होणार आहे. सेबीच्या अध्यक्षांना त्या पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी आम्ही प्रत्येक राज्याच्या राजधानीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयाचा घेराव घालणार आहोत.
-
डीआरडीओला मोठे यश, मुख्य-पोर्टेबल अँटी-टँक गाइडेड क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने अलीकडेच राजस्थानमधील जैसलमेर येथील फील्ड फायरिंग रेंजवर भारतीय बनावटीच्या मेन-पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्राची (MP-ATGM) यशस्वी चाचणी घेतली. डीआरडीओच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
-
मविआचे विरोधक कुठल्या न कुठल्या विषयावर राजकारण करतात: रवी राणा
उद्धव ठाकरेंचं सरकार असतांना लोकहिताची एक योजना तरी आणली का? असा प्रश्न आमदार रवी राणा यांनी उपस्थित केला आहे. रवी राणा यांनी सोमवारी एका सभेत ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून 1500 रुपये वापस घेणार,असं रवी राणा म्हणाले होते. मात्र विरोधकांनी टीका केल्यानंतर रवी राणा यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन रवी राणा हे मविआचे विरोधक कुठल्या न कुठल्या विषयावर राजकारण करतात, असं म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंचं सरकार असतांना लोकहिताची एक योजना तरी आणली का? असंही राणा यांनी स्पष्ट केलं.
-
“तुम्हाला योजना सुरू केली आणि यांची पोटदुखी सुरू”
शिक्षणासाठी मुलींना सुद्धा शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय या सरकारने घेतला. हे फक्त भाऊबीज आणि रक्षाबंधनची ओवाळणी नाही, तर वर्षभरासाठी दिलेलं आहे. तुम्हाला योजना सुरू केली आणि यांची पोटदुखी सुरू झाली, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “आनंदाचा शिधा बंद व्हावं म्हणून सुद्धा हे कोर्टात गेले.खरं म्हणजे कोरोनामध्ये खिचडी चोरून यांनी लोकांच्या तोंडचा घास पळवला”, अंसही शिंदे म्हणाले.
-
जो पर्यंत चंद्र, सूर्य तोपर्यंत कोणी आरक्षण संपवू शकत नाही – फडणवीस
जो पर्यंत चंद्र, सूर्य तोपर्यंत कोणी आरक्षण संपवू शकत नाही. निवडणूक आल्या काय खोट्या गोष्टी पसरवण्याचे काम करतात. महाविकास आघाडीचे नेत्यांवर देवेंद्र फडणवीस यांची जोरदार टीका.
-
घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळ तिघे एकाच व्यासपीठावर – गुलाबराव पाटील
घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळ येथे तिघे एकाच व्यासपीठावर असल्यामुळे टेन्शन नाही. दादा आम्ही तुमची काळजी घेतली आहे. तुमचा गुलाबी कलर आम्ही समोर बसवला आहे. त्यामुळे दादा पुढच्या काळात आपलं 100% भल झाल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास वाटतो असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
-
नीलम गोऱ्हे यांना आत्ता कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना आत्ता कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री सचिवालायकडून राजशिष्टाचार विभागाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे. २ ऑगस्ट २०२४ च्या निर्णयानुसार कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. नीलम गोऱ्हे यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार. शिंदे सरकार मध्ये नीलम गोऱ्हे या पहिल्या शिवसेनेच्या महिला कॅबिनेट मंत्री झाल्या असल्याची चर्चा सुरू.
-
विद्यार्थिनी बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट
पश्चिम बंगालमधील मेडिकल विद्यार्थिनी बलात्कार आणि हत्या प्रकरणात अपडेट समोर आली आहे. कोलकाता हायकोर्टाने प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे. यापुढे सीबीआय करणार या प्रकरणाची चौकशी होणार आहे. हे प्रकरण विचित्र असल्याचं कलकत्ता हायकोर्टाचं म्हणणं आहे.
-
अजित पवार आणि युगेंद्र पवारांमध्ये लढत?
विधानसभेला बारामतीत अजित पवार आणि युगेंद्र पवारांमध्ये लढत होणार आहे. निवडून येण्यास अजितदादांना कोणतीही अडचण येणार नाही. पार्थ पवार यांनी पिंपरीत पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना विश्वास व्यक्त केला आहे. पिंपरी- चिंचवड शहरात राज्यपाल नियुक्त आमदार मिळाला पाहिजे, असं वक्तव्य पार्थ पवारांनी केलं आहे. शिवाय मी संघटनेतील कोणतेही पद घेणार नाही, निवडणूक लढविण्यापेक्षा पक्ष वाढविण्यावर माझा भर आहे, असंही ते म्हणाले.
-
त्या जागेवरून महायुतीत अंतर्गत वाद?
राज्यसभेची जागा अजित पवार गटास देण्यास भाजपचा अंतर्गत विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडे असणाऱ्या दोन जागांपैकी एक जागा अजित पवार गटाला देण्याचं भाजपने आश्वासन दिलं आहे. खासदार उदयनराजे भोसले यांची रिक्त झालेली राज्यसभेची जागा अजित पवार गटाला दिली जाणार आहे. उदयनराजेच्या रिक्त जागेवर अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना संधी देण्याचं अजितदादांनी आश्वासन दिलं आहे. मात्र मकरंद पाटील यांच्या वाई विधानसभा मतदारसंघात उदयनराजे यांना अपेक्षित लीड न मिळाल्याने भाजप नाराज आहे. त्यामुळे नितीन पाटलांना राज्यसभेची जागा देण्यास भाजपचा अंतर्गत विरोध आहे.
-
महायुतीची समन्वय समितीची बैठक
आगामी विधानसभा निवडणुकीची अमरावतीत पश्चिम विदर्भाची महायुतीची समन्वय समितीची बैठक झाली आहे. 20 तारखेपासून सर्व जिल्ह्यात महायुतीचे मेळाव्याचे आयोजन केलं आहेपुढच्या मेळाव्यात रवी राणा व बच्चू कडू असतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. पश्चिम विदर्भातील 30 पैकी 25 जागा विधानसभा निवडणुकीत जिंकल्या पाहिजे यासाठी प्रयत्न.महायुतीत समन्वय आहे पुढील बैठकीत एकही असमन्वयाची ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही, असंही ते म्हणालेत.
-
नागपूरात अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
नागपूरात अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी काढला आहे. हा मोर्चा उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागपुरातील विजय गड बंगल्यापर्यंत जाणार होता. मात्र संविधान चौकात मोर्चा अडविला आहे.
-
सरकारने निधी रोखल्याने ग्रामीण भागात रस्त्यांची दुदर्शा – भास्कर जाधव
राज्य सरकारने विकास कामांचा निधी रोखून ठेवल्यामुळे ग्रामीण भागात रस्त्यांच्या समस्या निर्माण झाल्याचा आरोप शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला आहे.
-
गुलाबी रंगाचे जॅकेट घालून काही लोकं येतील तेव्हा त्यामागील काळी बाजू पहा – अमोल कोल्हे
गुलाबी रंगाचे जॅकेट घालून काही लोकं तुमच्यापुढे येतील तेव्हा त्याच्या मागील काळी बाजू पहा असे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
-
सुप्रिया सुळे यांनी सभेत व्हिडीओ दाखवला
मी जय श्रीराम म्हणत नाही, मी मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम म्हणते..आमदार रवी राणा यांचा व्हिडीओ सुप्रिया सुळेनी भर सभेत ऐकवला.
-
14 चोरट्याकडून 6 लाख 50 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅली मध्ये चोरी करणाऱ्या टोळीला कोतवाली पोलिसांनी केली अटक. टोळीतील 14 आरोपीना रॅली मधून कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केली अटक. 14 चोरट्या कडून 6 लाख 50 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त….
-
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज माढ्यात होत आहे
माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावात शिवस्वराज्य यात्रेच्या सभेला सुरुवात होतेय. या सभेला खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील संबोधित करणार आहेत
-
सुरेश वरपुडकर यांनी केले मोठे विधान
नाना पटोले यांनी माध्यमांना सांगितले पाथरी विधानसभेबाबत अद्याप घोषणा झालेली नाही, याबाबत मला माहिती नाही. मात्र, मी काँग्रेसचा पाथरी येथील विद्यमान आमदार आहे आणि पाथरी विधानसभा ही काँग्रेसची जागा आहे, आणि माझा त्या जागेवर क्लेम आहे, सुरेश वरपुडकर यांनी म्हटले.
-
मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत
मनोज जरांगे पाटील यांचे सिन्नर शहरात आगमन झाले असून या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांचे जेसीबी वरून पुष्पवृष्टी करत आणि क्रेनच्या साह्याने हार घालत स्वागत करण्यात येत आहे.
-
आयएनएस विक्रांत निधी अफरातफर प्रकरण, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
आयएनएस विक्रांत निधी अफरातफर प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट कोर्टाने फेटाळला.
सोमय्या यांच्याविरुद्धच्या आरोपांची अधिक चौकशी आवश्यक असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. न्यायालयाच्या भूमिकेमुळे सोमय्या तसेच पोलिसांना झटका बसला आहे.
मुंबई किल्ला कोर्टातील अतिरिक्त महानगर दंडाधिकारी एस. पी. शिंदे यांचा निर्णय
-
विधानपरिषदेतील १२ आमदार नियुक्तीचा गुंता लवकर सोडवा – शिंदे गटाच्या नेत्याची मागणी
विधानपरिषदेतील १२ आमदार नियुक्तीचा गुंता लवकर सोडवा, मुंबई उच्च न्यायालयाला तातडीने प्रकरण निकाली काढावी अशी मागणी शिंदे गटाचे नेते गोपीकिशन बजोरिया यांनी केली आहे. या प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी त्यांनी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाला विनंती केली आहे. यावर खंडपीठ 23 ऑगस्टला सुनावणी घेणार.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोल्हापूर शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी यांनी 12 आमदार नियुक्तीप्रकरणी मूळ याचिका दाखल केली होती.
-
सर्वात जास्त तुतारी सोलापूर जिल्ह्याने वाजवली – सुप्रिया सुळे
पक्ष गेला, चिन्हं गेले तेव्हा आपण फकीर होतो. पण पांडुरंगाची इच्छा बघा त्याने आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस दिला. तेव्हा सर्वात जास्त तुतारी सोलापूर जिल्ह्याने वाजवली. पण तुतारी पोहोचवण्याचे ट्रेनिंग म्हणून सोलापूर मॉडेल डेव्हलप करू. संघर्षाच्या काळात सोलापूरने आम्हाला साथ दिली, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
-
आदित्य ठाकरे यांची पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आज बैठक
पालिकेच्या जी साऊथ कार्यालयात आदित्य ठाकरे यांची पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आज दुपारी 3.30 वाजता बैठक होणार आहे. आगामी गणेशोत्सवाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची पालिकेच्या वार्ड ऑफिसला बैठक होईल. त्यानंतर आदित्य ठाकरे वरळी बीडीडी चाळीच्या चालू असलेल्या कामांचा आढावा घेणार आहेत.
-
भाजपसाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उतरणार मैदानात
भाजपसाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मतभेद विसरत संघाने कंबर कसली आहे. संघाचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये यांकडे महाराष्ट्राच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली असून ते निवडणुकीत भाजप व संघामध्ये समन्वय साधतील.
-
पुणे ड्रग्स प्रकरणात अजून एक आरोपी अटकेत
पुणे ड्रग्स प्रकरणातील आणखीन एका आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली. अटक केलेला आरोपी हा कुरिअरने ड्रग्स विकत असल्याची माहिती उघड झाली आहे. विश्वनाथ कोनापूरे अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
-
खड्ड्यांमुळे त्रस्त संतप्त महिलांचं अनोखं आंदोलन
कोल्हापूर मधील खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या संतप्त महिलांनी अनोखं आंदोलन केले आहे. रस्त्यावरील खड्ड्यात बसून महिलांनी केक कापला. खड्ड्यान भोवती रांगोळी काढून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला.
-
मुंबई – बंगळुरू महामार्गावर अपघात सत्र सुरूच
मुंबई – बंगळुरू महामार्गावर अपघात सत्र सुरूच आहे. स्वामीनारायण मंदिराजवळ एका मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने काल सायंकाळच्या सुमारास तीन वाहनांना धडक दिली. या अपघातात एकजण किरकोळ जखमी झाला आहे.
-
चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या
येरवडा येथील ऐतिहासिक पांडवकालीन तारकेश्वर मंदिरात दानपेटी फोडणारी टोळी पकडण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे. पर्णकुटी टेकडीवरील तारकेश्वर मंदिरात 4 जून रोजी रात्री दीड ते पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात इसमाने मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरातील स्टिलच्या 6 दानपेट्या फोडून त्यातील अंदाजे 2 लाख रुपयांची रक्कम चोरून नेली होती.
-
हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली
हर घर तिरंगा अभियानांतर्गत सांगली जिल्हा परिषदे कडून आज तिरंगा सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी राजा दयानिधी , पोलीस अधीक्षक संदीप घुगे , महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि जिल्हा परिषद सीईओ तृप्ती धोडमिसे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
-
भाजपची कमान महिलेच्या हाती?
भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष कोण होणार यावरुन पुन्हा खलबतं सुरू झाली आहेत. जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस यांचे नाव समोर येत असतानाच भाजप आता नारी शक्तीला वंदन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
-
शरद पवार गटाची यात्रा माढा आणि करमाळा तालुक्यात
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची यात्रा आज सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्यात असणार आहे. या यात्रेमध्ये खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील आदी नेते मार्गदर्शन करणार आहेत. काल मोहर मध्ये अमोल कोल्हेंना घेराव घातल्याच्या घटनेनंतर सोलापुरातील शासकीय विश्रामगृहामध्ये पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
-
Maharashtra News : मिलिंद नार्वेकर यांचा आज रत्नागिरीचा महत्त्वाचा दौरा
ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा आज रत्नागिरीचा महत्त्वाचा दौरा. उदय सामंत यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देण्याबाबत ठाकरे गटात खलबतं. उमेदवार पक्षातीलच हवा? का बाहेरून आलेला सक्षम उमेदवार देखील स्वीकारला जाईल? यावर मंथन. रत्नागिरी-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघात उमेदवारीबाबत ठाकरे गटात सर्व शक्यतांवर चर्चा.
-
Maharashtra News : आरक्षणावर चर्चेतून मार्ग काढण्यासाठी आम्ही तयार – सुप्रिया सुळे
“आरक्षणावर चर्चेतून मार्ग काढण्यासाठी आम्ही तयार आहोत. संसदेत आरक्षणावर मी जास्त बोलले. आमचं काम पारदर्शक. मी संसदेत बोलल्यावर माझ्या नवऱ्याला ईडीची नोटीस येते” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
-
Maharashtra News : धारदार शस्त्राने जन्मदात्या बापाचा खून
मुलाने धारदार शस्त्राने केला जन्मदात्या बापाचा खून केला. धाराशिवमधील भूम तालुक्यातील आंतरगाव येथे ही घटना घडली. रागाच्या भरात जन्मदात्या बापाचा मुलाने केला खून. खून करून मृतदेह फेकला बाणगंगा नदीत. जन्मदात्या बापाचा खून करणाऱ्या संशयित 30 वर्षीय मुलास अटक.
-
Maharashtra News: छगन भुजबळांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी आणि कार्यालया बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला… आज नाशिकमध्ये म्हणत जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप… मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त… काल दुपारपासून पोलिसांच्या बंदोबस्त्यात करण्यात आली वाढ…
-
Maharashtra News: मराठा आरक्षणविरोधी सर्व याचिकांवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी
मराठा आरक्षणविरोधी सर्व याचिकांवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी… नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावर होणार सुनावणी… आरक्षणाच्या विरोधात आणि समर्थनात विविध याचिका हायकोर्टात दाखल…
-
Maharashtra News: योजना लाडक्या बहिणींसाठी नसून मतं विकत घेण्यासाठी आहेत – संजय राऊत
योजना लाडक्या बहिणींसाठी नसून मतं विकत घेण्यासाठी आहेत… पैसे काढून घेणारे तुम्ही कोण? संजय राऊत यांचा राणांवर निशाणा… नावणीत राणा आता घरीच असतील चुलीवर त्यांनी सांगावं 1500 हजार रुपयात घर चालतं का.?
-
Maharashtra News: विधानसभा निवडणुका वेळेतच घ्याव्या लागतील – संजय राऊत
विधानसभा निवडणुका वेळेतच घ्याव्या लागतील… खोकेवाल्यांचं सरकार आम्हाला घालवायचंय… लोकसभेचा सर्व्हेही त्यांना अनुकूल नव्हता… राज्यात मविआचं सरकार येणार… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: मेट्रोने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी गुडन्यूज
मेट्रोने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी गुडन्यूज… गणेशोत्सवापर्यंत पुणे मेट्रो धावणार स्वारगेट पर्यंत… सिविल कोर्ट ते स्वारगेट या तीन 3.6 किलोमीटर भुयारी मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात… या नव्या भुयारी मार्गावर मेट्रोची चाचणी देखील पूर्ण… या मार्गावरील मेट्रो स्थानकाची कामे देखील अंतिम टप्प्यात असून महिना अखेरीस सर्व स्थानक होणार पूर्ण…
-
Maharashtra News Live : पुणेकरांसाठी गुडन्यूज, गणेशोत्सवापर्यंत पुणे मेट्रो स्वारगेटपर्यंत धावणार
मेट्रोने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी गुड न्यूज
गणेशोत्सवापर्यंत पुणे मेट्रो धावणार स्वारगेट पर्यंत
सिविल कोर्ट ते स्वारगेट या तीन 3.6 किलोमीटर भुयारी मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात
या नव्या भुयारी मार्गावर मेट्रोची चाचणी देखील पूर्ण
या मार्गावरील मेट्रो स्थानकाची कामे देखील अंतिम टप्प्यात असून महिना अखेरीस सर्व स्थानक होणार पूर्ण
-
Maharashtra News Live : नाशिक शहरातील वाहतूक मार्गात बदल
– आज नाशिक शहरातील वाहतूक मार्गात बदल – मराठा आरक्षण शांतता मोर्चामुळे वाहतूक मार्गात करण्यात आला बदल – वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक मार्गात बदल – आज सकाळी आठ वाजेपासून ते मोर्चा संपेपर्यंत पर्याय मार्गाचा वापर करावा – वाहतूक शाखेकडून नागरिकांना आवाहन – मोर्चा वेळी शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात करण्यात आले बदल
-
Maharashtra News Live : मराठा आरक्षण शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप
– मराठा आरक्षण शांतता रॅलीचा आज नाशिक मध्ये समारोप – पाच लाख समाज बांधवांच्या उपस्थितीचा अंदाज – रॅलीमुळे निम्म्या शहरातील आज रस्ते बंद – शहरातील सर्व शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी केली जाहीर – सिटीलींक बसच्या अकराशे फेऱ्या रद्द – तपोवन ते सीपीएस सात किलोमीटर पर्यंत रॅलीचे आयोजन
-
Maharashtra News Live : मराठा आरक्षण रॅलीत चोरीच्या अनेक घटना, चोरट्यांकडून चैन, मोबाईल आणि रोकड लंपास
मराठा आरक्षण रॅलीत चोरीच्या अनेक घटना
पुण्यात शांतता रॅलीमध्ये चोरट्यांनी सोनसाखळी, मोबाईल आणि रोकड चोरी केल्याच्या अनेक घटना
या घटनांमध्ये सुमारे नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास
या प्रकरणी विश्रामबाग आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
रॅलीत मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी नागरिकांची सोनसाखळी, मोबाईल आणि खिशातील रोकड चोरून नेली
-
Maharashtra News Live : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात तिसऱ्या क्रमांकावर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात तिसऱ्या क्रमांकावर
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क जाहीर
देशातील राज्य सार्वजनिक विद्यापीठ गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तिसरा क्रमांक मिळवला आहे
दमात्र देशातील विद्यापीठ गटात पुणे विद्यापीठाचे मानांकन घसरले आहे
सर्वसाधारण गटात पुणे विद्यापीठाने ३७ वे स्थान, तर विद्यापीठ गटातून २३ वा क्रमांक मिळवला आहे
देश पातळीवरील स्टेट युनिव्हर्सिटी कॅटेगिरीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनात केलेल्या कामगिरीमुळे देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे
Published On - Aug 13,2024 8:36 AM