Maharashtra Breaking News LIVE 17 January 2025 : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 17 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

मध्य रेल्वेच्या कर्जत स्टेशनमध्ये अभियांत्रिकी कामासाठी शुक्रवार आणि रविवारी दुपारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी बदलापूर ते खोपोलीदरम्यान,तर रविवारच्या ब्लॉक कालावधीत नेरळ आणि खोपोलीदरम्यानच्या उपनगरी लोकल सेवा बंद राहणार आहेत. संजय शिरसाट यांचा सिडको अध्यक्षपदाचा पदभार काढला. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडील सिडको अध्यक्षपदाचा पदभार काढण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीआधी त्यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र, आता त्यांची मंत्रिपदी नियुक्ती झाल्याने पूर्वीच्या पदभारातून त्यांना मुक्त करण्यात आले आहे. चारकोपच्या अथर्व रुग्णालयात रुग्णाने गोंधळ घातला आहे. गोंधळ घालणाऱ्या रुग्णाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अभिनेता सैफच्या घरात सक्तीच्या प्रवेशाची कोणतीही चिन्हे नाहीत असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं. जबरदस्तीने प्रवेश नसल्याने घुसखोर फ्लॅटमध्ये कसा घुसला हे स्पष्ट नाही, असे सैफ अली खानच्या घरात झालेल्या घटने संदर्भात डीसीपी (झोन IX) दीक्षित गेडाम यांनी नमूद केलं. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
दादा भुसे यांची अचानक शाळेला भेट
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पिंपरी- चिंचवड शहरातील महानगरपालिकेच्या शाळेला सरप्राईज भेट दिली. दादा भुसे हे 20 मिनिट पुणे जिल्ह्यातील पिंपळे निलखमधील शाळेत होते. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अचानक शालेय मंत्री शाळेत आल्याने शिक्षकांची मात्र धांदल उडाली.
-
केस गळतीचे कारण शोधण्यात अपयश
बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यात गेल्या वीस दिवसापासून केस गळतीचे दहशतीन अनेकांना चिंताग्रस्त करून सोडले आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेपासून राष्ट्रीय पातळीवरच्या आरोग्य संस्था केस गळतीचे कारण शोधण्यासाठी बाधित गावात येऊन गेल्या आहेत. मात्र अजूनही केस गळतीचे नेमके कारण शोधण्यात या आरोग्य संस्थांना यश आलेले नाही.
-
-
मनसे महानगराध्याक्षाने कंपनी व्यवस्थापकांच्या कानशिलात लगावले
जळगावमधील एमआयडीसीतील एका कंपनीत मराठी कामगारांवर अन्याय केला जात असल्याच्या विषयावरून मनसे शहराध्यक्षांनी परप्रांती व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. मनसे महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी थेट कंपनीचे मॅनेजर यांच्या कानाखाली लगावल्याचा प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
-
पतसंस्था ठेवीदारांचे उपोषण
आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ठेवीदारांचे छत्रपती संभाजीनगरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषण ठिकाणी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भेट दिली.
-
सैफवरील हल्ल्यामागे कोणत्याही अंडरवर्ल्ड टोळीचा हात नाही : मंत्री योगेश कदम
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने पोलिसांना कोणत्याही प्रकारच्या धमकीची माहिती दिली नव्हती, त्याने सुरक्षा मागितली नव्हती, असे मंत्री योगेश कदम यांनी म्हटले आहे. या हल्ल्यामागे अंडरवर्ल्ड टोळीचा हात नाही. सैफवरील हल्ल्यानंतर सरकार आणि पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे.
-
-
सैफ प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेतले आहे – गृह राज्यमंत्री योगेश
सैफ अली खान प्रकरणी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वक्तव्य समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. सैफ प्रकरणी दोन जणांची चौकशी सुरू आहे.
-
फारुख अब्दुल्ला यांच्या ताफ्याला दौसा येथे अपघात
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या ताफ्यातील वाहनाचा दौसा येथे अपघात झाला.
-
नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानावर रंगणार जागतिक कोल्ड प्ले संगीताचा कार्यक्रम
नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानावर 18 जानेवारी ते 21 जानेवारी या दरम्यान जागतिक दर्जाचा कोल्ड प्ले हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या 3 दिवसीय कार्यक्रमासाठी जगभरातून लाखो प्रेक्षक जमणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा,वाहतूक आणि इतर बाबी लक्षात घेता,आज पोलीस आणि आयोजकांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत नियम आणि अटी त्याच प्रमाणे प्रवेश याबाबत अधिक माहिती दिली. सामान्य नागरिकांना याचा कोणताही त्रास होऊ नये महिन उपाययोजना केली जाईल असे यावेळी सांगितले.
-
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शाळेला सरप्राईज भेट
पिंपरी-चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील महानगरपालिकेच्या शाळेला सरप्राईज भेट दिली आहे. दादा भुसे हे 20 मिनिट पिंपळे निलख मधील शाळेत होते. भुसेंनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अचानक शालेय मंत्री शाळेत आल्याने शिक्षकांची मात्र धांदल उडाली. शालेय मंत्र्यांनी विद्यार्थ्यांची बौद्धिक तपासणी करत काही प्रश्नही विचारले.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सैफ अली खान याची भेट घेण्याची शक्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनेता सैफ अली खान याची भेट घेण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फडणवीस सैफची लिलावती रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहेत. सैफवर 16 जानेवारीला रात्री 2 च्या दरम्यान चाकू हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफची प्रकृती स्थिर आहे. सैफला स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.
-
ठेवीदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ठेवीदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. आदर्श नागरी पतसंस्थेमध्ये झालेल्या 202 कोटी घोटाळ्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहेत.
-
धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ
महायुतीच्या काळात ते कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केला होता. हा बदल आता वादात सापडला आहे. धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदलले ? असा जाब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विचारला आहे. राज्य सरकारला हायकोर्टाने स्पष्टीकरण मागितले आहे.
-
गंगापूर तालुक्यात बिबट्याचे दर्शन
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मालुंजा गावाजवळील झाडावर बिबट्या चढला. बिबट्या झाडावर चढल्याचे बघून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गंगापूर तालुक्यातील माळुंजा परिसरामध्ये बिबट्यांचा वावर गेला काही दिवसांपासून असल्यामुळे लोक भयभीत झाले आहेत.
-
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम
शक्तिपीठ महामार्गाला धाराशिव जिल्ह्यातील बाधीत शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे.राज्य सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाच्या हालचाली गतिमान झाल्यावर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येवुन शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे गुरूवारी केली आहे.
-
कांदा उत्पादक चिंतेत
बांगलादेशाच्या निर्णयामुळे भारतीय कांदा उत्पादकांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. बांगलादेशात कांदा आयातीवर दहा टक्के शुल्क आकारण्यात येत आहे.तेथील कांदा बाजारात येत असल्याने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी तिथल्या सरकारने हा निर्णय घेतला.
-
सैफवर हल्ला प्रकरणात एक आरोपी ताब्यात
सैफ अली खान याच्यावर हल्ला प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
-
हल्लेखोराने शाहरूख खानच्या पण घराची केली होती रेकी
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीने शाहरूख खान याच्या घराची पण रेकी केल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोराने अगोदर शाहरूख खानच्य पण घराची रेकी केली होती.
-
Maharashtra News: 32 तास उलटूनही सैफ अली खानवर हल्ला करणारा अद्याप मोकाट
मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेतील चढाओढीचा तपासाला फटका… 32 तास उलटूनही सैफ अली खानवर हल्ला करणारा अद्याप मोकाट … वांद्रे पोलीस माहिती देत नसल्याचा गुन्हे शाखेतील सूत्रांचा दावा… सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर पोलीस ठाण्यच्या ताब्यात…
-
Maharashtra News: तृप्ती देसाई यांच्या आरोपांवर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील स्वामी समर्थ आश्रम केंद्र चर्चेत
स्वामी समर्थ आश्रमात वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांनी आश्रय घेतल्याचा केला होता आरोप… तसेच या आश्रमाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांच्यावर देखील केले होते काही गंभीर आरोप… अण्णासाहेब मोरे यांचे नाशिक जिल्ह्यासह राज्यात मोठा भक्त परिवार… याच आरोपांवर अण्णासाहेब मोरे यांच्या वतीने काय खुलासा करण्यात येतो याकडे लक्ष…
-
Maharashtra News: सिंहस्थ कुंभमेळा आराखड्याचे आज मंत्रालयात सादरीकरण होणार
सिंहस्थ कुंभमेळा आराखड्याचे आज मंत्रालयात सादरीकरण होणार… मंत्रालयात मुख्य सचिवांसमोर आराखड्याचे सादरीकरण केले जाणार… आराखड्यासाठी काही महिन्यांपासून बैठका सुरु… आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाकडून आराखडे तयार…
-
सैफ अली खानवर हल्ल्यानंतर आरोपी वांद्रा स्टेशनच्या दिशेने गेला का?
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी वांद्रा स्टेशनच्या दिशेने निघाला होता. हल्लेखोर नालासोपारा किंवा वसईच्या दिशेने जात असावा, असा पोलिसांना संशय आहे. वांद्रे स्थानक परिसरातील सीसीटीव्हीमध्ये त्याचे चित्र आहे पण ते चित्र लांबचे असून ते अस्पष्ट आहे.
-
लातुरच्या औसा एसटी बस आगारातील वाहक-चालकांचे काम बंद आंदोलन
दोनशे पेक्षा जास्त बस फेऱ्या बंद, एसटी आगारातून सकाळ पासून एकही बस बाहेर पडली नाही, औसा तालुक्यातल्या कोरंगला इथं काल रात्री प्रवासी आणि वाहक युवराज कांबळे यांच्यात झाला होता वाद. वादानंतर वाहकाला करण्यात आली बेदम मारहाण. मारहाणीत वाहक युवराज कांबळे जखमी, जखमी वाहकाला उपचारासाठी लातुरला हलवले, आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी औसा आगारातील वाहक चालकांनी पुकारले काम बंद आंदोलन.
-
ठाण्यात क्षयरोगाने हात-पाय पसरले
ठाण्यात क्षयरोगाने हात पाय पसरले. महिन्याभरात 500 नवीन रुग्ण. क्षयरोग रुग्ण बरे होण्याचे प्रमाण महापालिका हद्दीत 89 टक्के एवढे आहे. 24 ऑक्टोबर 2024 क्षयरोग शोध मोहीम अंतर्गत 41800 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 6471 क्षय रोगाचे रुग्ण आढळून आले होते.
-
पंढरपुरात आक्रोश मोर्चा
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 22 जानेवारीला पंढरपुरात आक्रोश मोर्चा. सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पंढरपुरात आक्रोश मोर्चाचे आयोजन. आमदार सुरेश धस, मनोज जरांगे यांच्यासह देशमुख कुटुंबीय मोर्चात होणार सहभागी.
-
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी लवकरच करीना कपूरचा देखील जबाब नोंदवला जाणार
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी लवकरच करीना कपूरचा देखील जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. आरोपीचा सुगावा अद्याप न लागल्याने आरोपी संदर्भात काही अधिक माहिती मिळते का ? यासाठी करीनाचा जबाब महत्त्वाचा ठरणार आहे. मध्यरात्री घरी आलेल्या हल्लेखोराशी करीनाचा देखील सामना झाला होता.
-
गडचिरोली देसाईगंज भागात पट्टेदार वाघाचे दर्शनामुळे दहशतीचे वातावरण
गडचिरोली देसाईगंज भागात पट्टेदार वाघाचे दर्शनामुळे दहशतीचे वातावरण आहे. साईगंज तालुक्याला लागून असलेल्या शेतीच्या भागात पट्टेदार वाघ शेतकऱ्यांना दिसला मात्र शेतकऱ्यांच्या आरड्याओरड्यामुळे वाघाने पळ काढला. या भागात शेतीचे अनेक कामे सुरू असून वाघ दिसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वर्षभरापूर्वीच या भागातूनच एका पट्टेदार वाघाला जेरबंद करण्यात आले होते. पुन्हा नवीन पट्टेदार वाघाचे दर्शन सध्या अनेक भागात होत आहे.
-
धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदीचं धोरण का बदललं ?
धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदीचं धोरण का बदललं ? हायकोर्टाने राज्यसरकारकडे स्पष्टीकरण माागितलं आहे. 2016 ला सुरू झालेल्या डीबीटी योजनेत 2023 ला बदल का केला ? असा सवालही कोर्टाने विचारला आहे.
-
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट सिडकोच्या अध्यक्ष पदावरून पदमुक्त
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना अखेर सिडकोच्या अध्यक्ष पदावरून पदमुक्त करण्यात आले. कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतरही शिरसाट हे अध्यक्षपदावर कायम होते. मागील महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. अखेर त्यांना सिडकोच्या अध्यक्ष पदावरून पदमुक्त करण्यात आले.
-
माहीम समुद्रकिनारी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.
माहीम समुद्रकिनारी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. मृतदेहाचे पाय बांधलेल्या अवस्थेत असल्याने हत्येचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. मृतदेहाच्या खांद्यावर प्रकाश नावाचा टॅटू असल्याचेही समोर आले आहे.
-
मध्य रेल्वेवर आज आणि रविवारी विशेष ब्लॉक
मध्य रेल्वेच्या कर्जत स्टेशनमध्ये अभियांत्रिकी कामासाठी आज, शुक्रवार आणि रविवारी दुपारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
आज दुपारी 1.50 ते 3.35 या दरम्यान बदलापूर ते खोपोलीदरम्यान ब्लॉक असेल. पळसधरी (क्रॉसओव्हर वगळून) आणि कर्जत स्थानकांदरम्यान (क्रॉसओव्हरसह) अप आणि मध्य लाइन तसेच कर्जत (कर्जत प्लॅटफार्म ३ च्या पनवेल दिशेकडे क्रॉसओवरसह) ते चौक, भिवपुरी स्टेशन (क्रॉसओवर वगळून) अप आणि डाउन लाइन दरम्यान हा ब्लॉक राहणार आहे.
तर रविवारच्या ब्लॉक कालावधीत नेरळ आणि खोपोलीदरम्यानच्या उपनगरी लोकल सेवा बंद राहणार आहेत.
Published On - Jan 17,2025 7:56 AM





