LIVE : अभिजीत बिचुकले जिल्हा न्यायालयात हजर

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

LIVE : अभिजीत बिचुकले जिल्हा न्यायालयात हजर
Picture

पाच महिन्यांत 36 हजार 431 मुंबईकरांना कुत्र्यांचा चावा, राज्यमंत्री योगेश सागर यांची माहिती

मुंबईत भटक्या कुत्र्यांनी मुंबईकरांवर हल्ला करण्याच्या प्रमाणात वाढ, गेल्या 5 महिन्यात मुंबईत 36 हजार 431 जणांना कुत्रे चावल्याची धक्कादायक बाब उघड, राज्यमंत्री योगेश सागर यांची विधानसभेत माहिती

22/06/2019,12:57PM
Picture

नाशिक शहरात घरफोडीचे सत्र सुरूच

नाशिकरोड परिसरात रात्री 2 ठिकाणी घरफोडी, कमला पार्क रो हाऊस सोसायटीतील दोन घरात चोरी, लाखो रुपयांच्या सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास, ठाकरे आणि गायकवाड कुटुंबियांची घरात चोरी

22/06/2019,12:50PM
Picture

अभिजीत बिचुकले जिल्हा न्यायालयात हजर

सातारा : अभिजीत बिचुकलेला जिल्हा न्यायालयात हजर केले, या सर्व राजकीय खेळ्या असून मला अडकवलं जातंय, अभिजीत बिचुकलेचा दावा

22/06/2019,12:48PM
Picture

लोणावळा : बेकायदा प्लास्टिक विक्री करणार्‍या 18 दुकांनांवर कारवाई; 350 किलो प्लास्टिक जप्त

लोणावळा : बेकायदा प्लास्टिक विक्री करणार्‍या 18 दुकांनांवर कारवाई; 350 किलो प्लास्टिक जप्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई, सुमारे एक लाखाहून अधिक किमतीचे प्लास्टिक जप्त, जप्त करण्यात आलेले प्लास्टिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जप्त

22/06/2019,9:08AM
Picture

अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी अर्थशास्त्रीय सोबत आज महत्त्वाची बैठक

अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी अर्थशास्त्रीय सोबत आज महत्त्वाची बैठक, येत्या 5 जुलैला सरकार अर्थसंकल्प सादर करणार, या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उपस्थित असणार

22/06/2019,9:02AM
Picture

कोल्हापूर - मुंबई विमानसेवेला 17 जुलैपासून पुन्हा सुरुवात

कोल्हापूर – मुंबई विमानसेवेला 17 जुलैपासून पुन्हा सुरुवात ट्रू जेट एअरलाइन देणार विमानसेवा, 1 वर्षानंतर पुन्हा विमानसेवा सुरु होणार

22/06/2019,9:02AM
Picture

WORLD CUP 2019 : आज टीम इंडिया अफगाणिस्तानशी भिडणार

सलग चारही सामन्यातील तीन सामन्यात विजयी (एक सामना रद्द) ठरलेली टीम इंडियाचा सामना आज अफगाणिस्तानशी होणार आहे. विजय शंकरचा दुखापतीतून सावरल्याचा दावा, तर शिखर धवनच्या जागी रिषभ पंतला संधी मिळणार

22/06/2019,7:48AM
Picture

अभिजित बिचुकलेला आज न्यायलयात हजर केले जाणार

बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेला सातारा पोलिसांकडून बेड्या, साताऱ्यातील चेक बाऊन्सप्रकरणी बिग बॉसच्या घरातून अटक, आज न्यायलयात हजर केले जाणार

22/06/2019,7:43AM
Picture

साताऱ्यानंतर नांदेड, यवतमाळ जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के

साताऱ्यानंतर नांदेड, यवतमाळ जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, काही ठिकाणी घरांना भेगा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

22/06/2019,7:42AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *