LIVE : छत्तीसगड येथे पोलिसांच्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार

दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE : छत्तीसगड येथे पोलिसांच्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार
Picture

छत्तीसगड येथे पोलिसांच्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार

छत्तीसगड येथील चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठसनान घालण्यात पोलीसांना यश, कोबिंग ऑपरेशन सुरु असताना नक्षलवादी हल्ल्याला प्रतिउत्तर देत पोलीसांनी चकमक सुरु केली, चकमकीत एक महिला व एक पुरुष नक्षली ठार, दंतेवाडा जिल्हयातील गुमीयापाल जगलातील घटना

14/07/2019,1:20PM
Picture

पिंपरी-चिंचवड : चिखलीत चिमुरड्यावर जिवघेणा हल्ला

चिखली परिसरातील भीमनगरमध्ये 3 वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला, या हल्ल्यात 3 वर्षीय मल्हार जाधव गंभीर जखमी, हल्लेखोर हा स्थानिक गुंड असल्याचं समोर येत आहे

14/07/2019,11:16AM
Picture

वाशिम येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चोरी

जिल्ह्यातील मेडशी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अज्ञात चोरट्याने फोडली, मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली, बँकेसोबतच शेजारील यादव इलेक्ट्रॉनिक दुकानही फोडले, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत

14/07/2019,10:13AM
Picture

वर्ध्यात ट्रॅक्टरच्या धडकेत 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

वर्धा शहरातील विविध भागात पालिकेकडून मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. भूमिगत मलनिस्सारण कामामुळे सिमेंटचे रस्ते जागोजागी खोदण्यात आले आहे. काल (13 जुलै) सायंकाळी गांधीनगर परिसरात वाणे यांच्या दवाखान्याजवळ मलनिस्सारण योजनेच्या कामावर गिट्टीचा ट्रॅक्टर आला होता. दरम्यान 11 वर्षीय आदित्य बैस हा सायकलने जात होता. एवढ्यात ट्रॅक्टरने चिमुकल्याच्या सायकलला जोरदार धडक बसली.

14/07/2019,8:30AM
Picture

विरार येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला

विरारमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. विरार पश्चिमेच्या नारंगी बायपास रोड ग्लोबल सिटी या परिसरात 50 ते 52 वर्षाच्या इसमाचा मृतदेह सापडला आहे. 5 ते 6 दिवसापूर्वीचा मृतदेह असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

14/07/2019,8:02AM
Picture

रेल्वेच्या आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत मेगाब्लॉक

14/07/2019,7:52AM
Picture

औरंगाबाद : शहरातील एटीएमची सुरक्षा धोक्यात

औरंगाबाद : शहरातील एटीएमची सुरक्षा धोक्यात, शहरातील पडेगाव सलग दुसऱ्या दिवशी एटीएम फोडण्याचा प्रयत्न, गॅस कटरने एटीएम मशीन कापण्याचा प्रयत्न, चोरट्यांकडून एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

14/07/2019,7:33AM
Picture

बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती

बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती, प्रदेशाध्यक्षपदासह 5 कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती, डॉ. नितीन राऊत, विश्वजीत कदम, बसवराज पाटील, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन या पाच जणांची कार्याध्यक्षपदी निवड

14/07/2019,7:28AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *