LIVE: हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

LIVE:  हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
Picture

मित्र आणि शत्रू बदलू शकतो पण शेजार नाही - हर्षवर्धन पाटील

कार्यकर्त्यांना अद्याप वाटत नाही की मी भाजपामध्ये आलो. हा अन्यायग्रस्त समाज आहे पण या समाजाला मुख्यमंत्र्यांनी पाठबळ द्यावं. आम्ही एका विचाराने चालणारे कार्यकर्ते आहोत, पण आता आम्ही विकासाच्या मुद्यांवर इथ आलो आहोत. मी कुठलीही अट घालून पक्षात आलेलो नाही. मुख्यमंत्र्यांचा हसरा चेहरा आहे, आता त्यांच्याबरोबर हर्षवर्धन आलेला आहे. मित्र आणि शत्रू बदलू शकतो पण शेजार नाही, आमच्या मतमतदारसंघाचा पाण्याचा प्रश्न सोडवा – हर्षवर्धन राजा

11/09/2019,4:08PM
Picture

हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील भाजपच्या मंचावर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

11/09/2019,3:44PM
Picture

काँग्रेसचे 19 उमेदवार निश्चित

काँग्रेस मुंबईत 25 जागांवर निवडणूक लढवणार, काँग्रेसचे 19 उमेदवार निश्चित, सहा जागा राष्ट्रवादीसाठी सोडल्या, एक जागा समाजवादी पक्षाला

11/09/2019,12:45PM
Picture

राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर भाजपच्या वाटेवर

औरंगाबाद : राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर भाजप प्रवेश करण्याची शक्यता, भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे व्याही

11/09/2019,10:05AM
Picture

तेलगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू नजरकैदेत

हैद्राबाद : तेलगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू नजरकैदेत, मुलगा नारा लोकेशही घरातच स्थानबद्ध, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीविरोधात आज नायडूंची निदर्शनं, विरोधी पक्ष नेत्यांना लक्ष्य करत असल्याचा नायडूंचा आरोप, टीडीपी कार्यकर्तेही पोलिसांच्या ताब्यात

11/09/2019,9:45AM
Picture

नागपूर विद्यापीठासाठी अजूनही विद्यासागर राव हेच राज्यपाल

नागपूर विद्यापीठासाठी अजूनही विद्यासागर राव हेच राज्यपाल, महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी, मात्र, नागपूर विद्यापीठ प्रशासन झोपेतच, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्यापही विद्यासागर यांचंच नाव

11/09/2019,8:00AM
Picture

हिंगणा येथे शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार

हिंगणा येथे शाळकरी मुलीवर सामुहिक बलात्कार, प्रकरण दाबण्यासाठी पोलीस तक्रार करण्यास उशीर, अखेर पीडितेच्या वडिलांकडून तक्रार दाखल, 4 आरोपींपैकी 2 अल्पवयीन, एक आरोपी नातेवाईक असल्याची माहिती

11/09/2019,7:32AM
Picture

मुंबईच्या क्रोफेर्ड मार्केटमधील 5 मजली युसूफ बिल्डिंगचा मागचा भाग कोसळला

दक्षिण मुंबईच्या क्रोफेर्ड मार्केटमधील 5 मजली युसूफ बिल्डिंगचा मागचा भाग कोसळला, अग्निशमन दलाकडून मदत कार्य, 3 ते 4 लोकांना सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल

11/09/2019,7:25AM
Picture

मुंबईत गोरेगाव स्थित फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये आग

मुंबईत गोरेगाव स्थित फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये आग, रात्री एक वाजताच्या सुमारास स्टुडिओ नंबर 3 मध्ये घटना घडली, जवळपास 15 कामगार सेटवर, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण, कोणतीही जीवितहानी नाही

11/09/2019,7:46AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *