LIVE : जळगावमध्ये आमदार सुरेश भोळे यांच्या दुचाकीला अपघात

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

LIVE : जळगावमध्ये आमदार सुरेश भोळे यांच्या दुचाकीला अपघात
Picture

जळगावमध्ये आमदार सुरेश भोळे यांच्या दुचाकीला अपघात

जळगावमध्ये आमदार सुरेश भोळे यांच्या दुचाकीला अपघात, सुरेश भोळे जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

12/09/2019,1:30PM
Picture

मेरी कोमची 'पद्म विभूषण' पुरस्कारासाठी शिफारस

बॉक्सर मेरी कोमची ‘पद्म विभूषण’ पुरस्कारासाठी शिफारस, क्रीडा मंत्रालयातील सूत्रांची माहिती, पीव्ही सिंधूची ‘पद्मभूषण’, तर कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा आणि क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर यांची ‘पद्मश्री’साठी शिफारस

12/09/2019,1:15PM
Picture

भास्कर जाधवांचा शुक्रवारी (13 सप्टेंबर) शिवसेना प्रवेश

भास्कर जाधव शुक्रवारी (13 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता विधानभवनात जाऊन आमदारकीचा राजीनामा देणार, दुपारी 2 वाजता शिवसेनेत प्रवेश, सुभाष देसाई, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर आणि उदय सामंत यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना आमदारही उपस्थित असणार

12/09/2019,11:56AM
Picture

नांदेड विमानतळावरुन मुंबई-दिल्ली विमानसेवा 2 दिवस बंद

अवयव घेऊन जाण्यासाठी आलेलं चार्टर्ड विमान धावपट्टीवरून घसरलं, धावपट्टीवर बिघाड, नांदेडमधील मुंबई-दिल्ली विमानसेवा 2 दिवस बंद, विमानातील डॉक्टर पथक, पायलट, को-पायलट सुखरूप

12/09/2019,11:34AM
Picture

जायकवाडी धरणाची पाणी पातळी 94 टक्क्यांवर

12/09/2019,11:28AM
Picture

भामरागड-पर्लाकोटा मार्ग सातव्यांदा बंद

12/09/2019,11:11AM
Picture

पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार

पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढणार, सकाळी 11 वाजल्यापासून 3468 पाण्याचा विसर्ग होणार

12/09/2019,9:35AM
Picture

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे शरद पवार यांची भेट घेणार

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे शरद पवार यांची भेट घेणार, सकाळी 10 वाजता पुण्यातील मोदी बागेत होणार भेट, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार

12/09/2019,8:21AM
Picture

साताऱ्यात पुणे-बेंगळुरु महामार्गावरील अपघातात 5 जणांचा मृत्यू

साताऱ्यात पुणे-बेंगळुरु महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हलची भीषण धडक, ट्रॅव्हलमधील 5 जणांचा मृत्यू, 15 प्रवासी जखमी, जखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

12/09/2019,8:15AM
Picture

नागपूर जिल्ह्यातील वेना नदीत बुडून काका पुतण्याचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील वेना नदीत बुडून काका पुतण्याचा मृत्यू, गणेश विसर्जनासाठी गेले असताना पाण्यात बुडले, काका खोल पाण्यात बुडत असताना पुतण्या वाचवायला गेला मात्र तोही बुडाला, सुरेश फिरके असं काकांचं तर अजिंक्य फिरके पुतण्याचं नाव

12/09/2019,8:10AM
Picture

सोनिया गांधींनी काँग्रेसची महत्त्वाची बैठक बोलावली

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी आज काँग्रेसची दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली, सरचिटणीस आणि राज्याच्या काँग्रेस प्रदेश अध्यक्ष उपस्थित राहणार, पक्ष संघटन मजबूत, नेत्यांचे पक्षांतर आणि विधानसभा निवडणूकीवर चर्चा करणार

12/09/2019,8:05AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *