LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Picture

रत्नागिरीतील खड्डेमय रस्त्यांचा मुख्यमंत्र्यासमोर निषेध करण्यासाठी निघालेल्यांची धरपकड

रत्नागिरीतील खड्डेमय रस्त्यांचा मुख्यमंत्र्यासमोर निषेध नोंदवण्यासाठी निघालेल्यांची धरपकड, खेड पोलिसांची कारवाई, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतिबांसह 15 जण ताब्यात

17/09/2019,1:45PM
Picture

प्लास्टिक घेऊन मालेगावहून जळगावला जाणाऱ्या ट्रकला धुळे येथील चाळीसगाव चौफुलीजवळ आग

प्लास्टिक घेऊन मालेगावहून जळगावला जाणाऱ्या ट्रकला धुळे येथील चाळीसगाव चौफुलीजवळ आग, शॉट सर्किटमुळे गाडीच्या केबिनने पेट घेतल्याचा संशय, मध्यरात्री 12 : 30 वाजताची घटना, कोणतीही जीवितहानी नाही, मात्र, गाडीचे लाखो रुपयांचे नुकसान

17/09/2019,12:21PM
Picture

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सिंधुदुर्गात

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सिंधुदुर्गात, नारायण राणे मुख्यमंत्री फडणवीसांचे स्वागत करणार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या राणेंच्या सूचना, कणकवलीत दुपारी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा

17/09/2019,12:10PM
Picture

नागपूरमध्ये राज्यमंत्री दर्जा असलेल्या किशोर तिवारींची भाजपपासून फारकत

नागपूरमध्ये शेतकरी मिशनचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री दर्जा असलेल्या किशोर तिवारींची भाजपपासून फारकत, सरकारच्या कामावर नाराजी, शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार

17/09/2019,10:27AM
Picture

निर्दयी मातेने 9 तासांपूर्वी जन्मलेले स्त्री जातीच्या बाळाला काटेरी झुडपात टाकले

निर्दयी मातेने 9 तासांपूर्वी जन्मलेले स्त्री जातीच्या बाळाला काटेरी झुडपात टाकले, मालेगाव तालुक्यातील गाळाने-चिंचवे येथील संतापजनक प्रकार, रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीला रडण्याचा आवाज आल्याने बाळ सापडले, पोलिसांच्या मदतीने अर्भक वडणेरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल

17/09/2019,10:23AM
Picture

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे 4 दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे 4 दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस, काही भागात 4 ते 5 फूट पाणी साचले, अन्न धान्य, कपडे, विद्यार्थ्यांचे कागदपत्रे भिजून खराब, शासकीय स्तरावरील यंत्रणा उदासीन, सामाजिक संस्थांचा मदतीचा हात

17/09/2019,10:15AM
Picture

संततधार पावसाने भिवंडी शहरातील रस्त्यांसह सखल भागात पाणी

भिवंडी शहरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु, रस्त्यांसह सखल भागात पावसाचे पाणी, नदीनाका, तिनबत्ती, कल्याण रोड, इदगाह, पदमानगर, कमला हॉटेल या भागात पाणीच पाणी

17/09/2019,10:11AM
Picture

उस्मानाबादमध्ये मराठवाडा मुक्ती दिनाच्या शासकीय कार्यक्रमाला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीची दांडी

उस्मानाबादमध्ये मराठवाडा मुक्ती दिनाच्या शासकीय कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधीची दांडी, पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते उद्घाटन, खासदार ओमराजे निंबाळकर, सेना आमदार ज्ञानराज चौघुले, राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे, काँग्रेसचे आमदार मधुकरराव चव्हाण कार्यक्रमाला गैरहजर

17/09/2019,10:08AM
Picture

वर्ध्यातील 11 मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांपैकी 9 प्रकल्प भरले

निम्न वर्धा प्रकल्पातून 3000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, प्रकल्पाचे 31 दरवाजे 3 सेंटीमीटरने उघडले, जिल्ह्यात आतापर्यंत 841.47 मिमी पाऊस, जिल्ह्यातील 11 मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांपैकी 9 प्रकल्प भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

17/09/2019,10:06AM
Picture

जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाने शेतीचं मोठं नुकसान

जळगाव जिल्ह्यासह अनेक भागात जोरदार पाऊस, सततच्या पावसाने शेतात पाणी, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, दुष्काळाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांरी मेटाकुटीला, पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी

17/09/2019,10:02AM
Picture

पालघरमध्ये आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्ताने प्रशासन अर्ध्या रात्री खडबडून जागे

पालघरमध्ये आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्ताने प्रशासन अर्ध्या रात्री खडबडून जागे, रात्री 10 वाजता मनोर-पालघर महामार्गावरील खड्डे बुजवले, पालघर-मनोर महामार्गाच्या दुरावस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष

17/09/2019,9:58AM
Picture

सिंचन घोटाळ्यात 20 एफआयआर दाखल

सिंचन घोटाळ्यात 20 एफआयआर दाखल, गोसीखुर्द प्रकल्पातील 155 टेंडर्सची चौकशी, उच्च न्यायालयात सरकारचं प्रतिज्ञापत्र, अजित पवारांबाबत सरकारचं उत्तर नाही

17/09/2019,9:51AM
Picture

वर्ध्यात वाघिणीची दहशत

वर्ध्यात वाघिणीची दहशत, गायीच्या शिकारीसह अस्वलही ठार, कारंजा (घाडगे) तालुक्यातील उमरी शिवारातील घटना

17/09/2019,9:49AM
Picture

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून महाजनादेश यात्रेच्या मार्गात पोस्टरबाजी

कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी काँग्रेसची सरकारविरोधात पोस्टरबाजी, महाजनादेश यात्रा मार्गात मध्यरात्री पोस्टर लावली, पोलिसांनी तात्काळ पोस्टर उतरवली

17/09/2019,9:47AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *