टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी गजानन उमाटेंना ‘वन्हार्टी’तर्फे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

नागपूर : ‘टीव्ही 9 मराठी’चे नागपूर प्रतिनिधी गजानन उमाटे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गजानन उमाटे यांच्या सर्वसामान्यांच्या पत्रकारितेसाठी ‘वसंतराव नाईक मानवी विकास- संशोधन संस्था (वन्हार्टी)’ ने हा पुरस्कार देऊन गजानन उमाटे यांचा गौरव केला. आमदार हरीभाऊ राठोड यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. टीव्ही 9 मराठीच्या माध्यमातून आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी …

टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी गजानन उमाटेंना ‘वन्हार्टी’तर्फे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

नागपूर : ‘टीव्ही 9 मराठी’चे नागपूर प्रतिनिधी गजानन उमाटे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गजानन उमाटे यांच्या सर्वसामान्यांच्या पत्रकारितेसाठी ‘वसंतराव नाईक मानवी विकास- संशोधन संस्था (वन्हार्टी)’ ने हा पुरस्कार देऊन गजानन उमाटे यांचा गौरव केला. आमदार हरीभाऊ राठोड यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

टीव्ही 9 मराठीच्या माध्यमातून आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. यात नागपूर एपीएमसी मार्केटमधील घोटाळा, पीक कर्जवाटपातला घोळ, दिल्लीत झालेला ऐतिहासिक किसान मुक्ती मोर्चा यासह त्यांनी केलेल्या वार्तांकनासाठी ‘वन्हार्टी’तर्फे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

नागपूरातील वसंतराव नाईक महाविद्यालयातील स्वातंत्र्य सभागृहात आज हा पुरस्कार सोहळ पार पडला. यावेळी वन्हार्टीचे प्रवर्तक एकनाथ पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *