मानाच्या ENBA पुरस्करांमध्ये टीव्ही 9 मराठीची बाजी

नवी दिल्ली : टीव्ही 9 मराठीने मानाच्या ENBA पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. ऑपरेशन बाजार आणि मिशन 400 ला बेस्ट प्रोग्राम म्हणून गौरवण्यात आलंय. चालू घडामोडी विभागातील पुरस्कार टीव्ही 9 मराठीला प्रदान करण्यात आला. टीव्ही 9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक रोहित विश्वकर्मा यांच्यासह टीमने हा पुरस्कार स्वीकारला. ऑपरेशन बाजारमध्ये टीव्ही 9 मराठीने राज्यभरातील शेतकऱ्यांची कैफीयत मांडली होती. …

TV9 Marathi, मानाच्या ENBA पुरस्करांमध्ये टीव्ही 9 मराठीची बाजी

नवी दिल्ली : टीव्ही 9 मराठीने मानाच्या ENBA पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. ऑपरेशन बाजार आणि मिशन 400 ला बेस्ट प्रोग्राम म्हणून गौरवण्यात आलंय. चालू घडामोडी विभागातील पुरस्कार टीव्ही 9 मराठीला प्रदान करण्यात आला. टीव्ही 9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक रोहित विश्वकर्मा यांच्यासह टीमने हा पुरस्कार स्वीकारला.

ऑपरेशन बाजारमध्ये टीव्ही 9 मराठीने राज्यभरातील शेतकऱ्यांची कैफीयत मांडली होती. बाजार समित्यांमध्ये शैतकऱ्यांना मिळणारा हमीभाव व्यापारी स्वतःच कसा हडप करतात, याची परिस्थिती टीव्ही 9 मराठीने स्टिंग ऑपरेशनने समोर आणली होती.

मिशन 400 लाही बेस्ट प्रोग्राम म्हणून पुरस्कार देण्यात आला. वसई-विरारमध्ये मिठागरामध्ये महापूर आला होता. यावेळी शेकडो लोक अडकले होते. टीव्ही 9 मराठीने यावेळी फक्त वार्तांकनच केलं नाही, तर अडकलेल्या लोकांपर्यंत अन्नही पुरवलं होतं. प्रतिनिधी राहुल झोरी यांनी सहा किमी पाण्यात जाऊन वार्तांकन केलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *