लातूरमध्ये महिलेला 60 व्या वर्षात जुळी मुलं

लातूर : वंध्यत्व आता काही शाप राहिलेला नाही. तरी देखील लोकांमध्ये अजूनही वंध्यत्वाबद्दल अनेक समज गैरसमज पहायला मिळतात. राज्यात जसं  स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचं  प्रमाण आहे त्याचप्रमाणे पुरुषांमध्येही वंध्यत्वाच प्रमाण आहे. मात्र आता त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही. कारण आता वयाच्या 65 व्या वर्षीही संतती प्राप्त होऊ शकते हे सिद्ध झालं आहे. लातूरमध्ये अश्याच एका वृद्ध दाम्पत्याने …

लातूरमध्ये महिलेला 60 व्या वर्षात जुळी मुलं

लातूर : वंध्यत्व आता काही शाप राहिलेला नाही. तरी देखील लोकांमध्ये अजूनही वंध्यत्वाबद्दल अनेक समज गैरसमज पहायला मिळतात. राज्यात जसं  स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचं  प्रमाण आहे त्याचप्रमाणे पुरुषांमध्येही वंध्यत्वाच प्रमाण आहे. मात्र आता त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही. कारण आता वयाच्या 65 व्या वर्षीही संतती प्राप्त होऊ शकते हे सिद्ध झालं आहे. लातूरमध्ये अश्याच एका वृद्ध दाम्पत्याने आपल्या जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा केला आहे.

बीड जिल्ह्यातील सुकळी गावचं हे वृद्ध दाम्पत्य आहे. चाळीस वर्षापासून आपल्याला मुलं  व्हावं यासाठी प्रयत्न करत होते. अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतल्या नंतरही पदरी निराशाच येत होती.  कधी शुगर, कधी ब्लड प्रेशर तर कधी वय आडवे यायचे. अखेर त्यांनी लातूरच्या डॉ. अमीर शेख आणि डॉ. रजिया शेख यांचा सल्ला घेतला आणि टेस्टट्यूब बेबीचा पर्याय निवडला. टेस्टट्यूब बेबीच्या माध्यमातून वयाच्या 65 व्या वर्षी धनराज गायकवाड यांना जुळी मुलं झाली. त्यांच्या पत्नीचं वय त्यावेळी 60 होते. एवढ्या उतार वयात मुलं होणारे हे देशातलं पहिलं दाम्पत्य असल्याचा दावा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉकटरांनी केला आहे. त्यामुळे वृद्धपकाळात आई-वडील झाल्याचा आनंद आता त्यांना शब्दात सांगता येत नाही. त्यांना आभाळही ठेंगणे झालं आहे.

गायकवाड दाम्पत्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती क्रांती बिरादार यांची होती. क्रांती ह्या चांगल्या पदावर नोकरी करत होत्या. नोकरीच्या व्यापामुळे त्यांना मुलं  होण्यासाठी उपचार घेणे शक्य होत नव्हते. त्यातच टेस्टट्यूब बेबीबद्दल पती आणि कुटुंबियांत गैरसमज असल्याने ते शक्य होत नव्हते. मात्र जेव्हा त्यांना निपुत्रिक म्हणून कौटुंबिक कार्यक्रमात आणि इतरत्र हिणवले जाऊ लागले. तेव्हा मात्र त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि दवाखाना गाठला. यशस्वी उपचार पद्धती नंतर त्या आता एका  मुलीच्या आई आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना आता मोठ्या समाजसेवी कंपनीत नोकरीही मिळाली आहे.

वंध्यत्व हा समाजातील शाप जरी वाटत असला तरी टेस्टट्यूब बेबी हे त्यावरचे प्रभावी उपाय ठरते आहे. लाखो लोकांच्या जीवनात यामुळे आनंदाचे क्षण आले आहेत. अनेक जण माता-पिता यामुळेच बनू शकले आहेत. लातूरच्या डॉ. आमिर शेख यांच्या दवाखान्यात तर आतापर्यंत बारा हजारांच्यावर टेस्टट्यूब बाळांनी जन्म घेतला असल्याचे ते सांगतात.

टेस्टट्यूब बेबी असलेल्या चार बाळांचा वाढदिवस डॉ .अमीर शेख यांच्या केजीएन हॉस्पिटलमध्ये एकत्रित साजरा करण्यात आला. यातून वंध्यत्वावर सहज मात करता येते हा संदेश त्यांना द्यायचा होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *