शरद पवार भूल देतायत की दिशाभूल करतायत?

पवार म्हणतायत की नव्या कायद्यांनी हमीभाव आणि बाजार समित्यांची व्यवस्था खिळखिळी होईल तर तोमर म्हणतायत की पवारांसमोर चुकीची माहिती ठेवली जातेय

शरद पवार भूल देतायत की दिशाभूल करतायत?
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 10:11 AM

मुंबई : केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि शरद पवार यांच्यात सध्या ट्विटरवरून (Twitter War In Sharad Pawar And Narendra Singh Tomar) आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. हमीभाव आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या याबाबत दोघांमध्ये मतभेद असल्याचं दिसत आहे. पवार म्हणतायत की नव्या कायद्यांनी हमीभाव आणि बाजार समित्यांची व्यवस्था खिळखिळी होईल तर तोमर म्हणतायत की पवारांसमोर चुकीची माहिती ठेवली जातेय (Twitter War In Sharad Pawar And Narendra Singh Tomar).

पवारांचे ते 9 ट्विट

महाराष्ट्रासह देशभरात बजेटवर चर्चा असतानाच शरद पवारांनी एका पाठोपाठ 9 ट्विट केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना उद्देशून केली आहेत. त्यांच्या ट्विटमध्येही दोन गोष्टीवर भर आहे. पहिली, मंडी व्यवस्थेचं (महाराष्ट्रात बाजार समित्या, आडती) काय होणार आणि दुसरं शेती मालाला हमीभाव. पवार ट्विटमध्ये म्हणतात, मूळ स्वरूपाच्या कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य हमीभाव देण्याचे कोणतेही अभिवचन दिले गेले नव्हते. केवळ शेतकरी आंदोलनानंतर त्यात एमएसपीचा संदर्भ आणला गेला. दुसरी, नवी कायद्यानुसार शेतकरी आपला माल बाजार समितीच्या बाहेर विकू शकतात, परंतु त्यात खासगी खरेदीदारांकडून खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण दिलेले नाही. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे हे सुरुवातीपासूनच म्हणणं होतं.

केंद्रीय कृषी मंत्र्यांचं जशास तसं उत्तर

पवारांनी एका पाठोपाठ 9 ट्विट केल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री तोमर उत्तर देणार नाहीत असं कसं होईल. तेही ट्विटमध्ये म्हणाले, शरद पवार हे एक वरिष्ठ नेते आहेत. केंद्रीय कृषी मंत्री असताना, त्यांनीच शेती कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. आणखी एका ट्विटमध्ये तोमर म्हणतात, मंडी व्यवस्थेवर कुठलाही परिणाम होणार नाही, उलट त्या आणखी फायदेशीर आणि स्पर्धात्मक बनतील.

शरद पवार (@PawarSpeaks ) जी वरिष्ठ राजनेता और पूर्व केंद्रीय कृषि मंत्री हैं। वे कृषि से जुड़े मुद्दों और उनके समाधान से भलीभाँति वाकिफ हैं। पूर्व में उन्होंने भी कृषि संबंधी सुधारों को लाने की पुरजोर कोशिश की थी।

— Narendra Singh Tomar (@nstomar) January 31, 2021

मग कायदे रद्द करण्याची मागणी का?

बाजार समित्या, आडत्यांची व्यवस्था बदलली पाहिजे अशी भूमिका शरद पवारांनी अनेक वेळेस घेतलेली आहे. काही दिवसांपुर्वी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पवारांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’तल्या उताऱ्यांसह ते दाखवून दिलं आहे. केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी स्वत:च त्यासाठी राज्यांना पत्रं लिहिल्याचही पवार मान्य करतात. पण मग असं असतानाही जर केंद्रातल्या तीन कायद्यांबाबत एवढाच आक्षेप असेल तर त्यात बदल करा, किंवा सुधारणा करा अशी मागणी न करता किंवा भूमिका न घेता, ते सरसकट रद्द करा अशी भूमिका पवार का घेतायत? 9 डिसेंबरला राहुल गांधी, शरद पवार, सीताराम येचुरी या शिष्टमंडळानं राष्ट्रपतींची भेट घेऊन तीनही कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे (Twitter War In Sharad Pawar And Narendra Singh Tomar).

पवारांच्या भूमिकेत राजकीय गणित जास्त?

शरद पवार हे लोकभावनेची नस ओळखणारे नेते म्हणून ओळखले जातात. ज्या वेळेस दिल्लीतलं आंदोलन चांगलं पेटलेलं होतं त्यावेळेस पवार दिल्लीतच होते. त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी भेटण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा आहे. पण खुद्द शेतकऱ्यांनीच आंदोलनातून राजकीय नेत्यांना दूर ठेवलं. पण शेवटी नाशिकच्या शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानावर आला. तेव्हा मात्र शरद पवार हेच त्या व्यासपीठावरचे सर्वात मोठे नेते होते. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचं अंबानी-अदानी ह्या उद्योगपतींबाबत मोठ मोठे आरोप आहेत. पवारांनी मात्र कुठल्याच व्यासपाठीवर अशा उद्योगसमुहांच्याविरोधात ना वक्तव्य केलं ना भूमिका घेतली. एवढच नाही तर शेतकरी नेत्यांची कार्पोरेटसबद्दल असलेली भीती चुकीची आहे किंवा नाही हे स्वत: ठोसपणे सांगत नाही. ती जबाबदारी त्यांनी सरकारवर टाकली. पवारांनी जे 9 ट्विट केलेत त्यातही त्यांची हीच भूमिका दिसतेय (Twitter War In Sharad Pawar And Narendra Singh Tomar).

संबंधित बातम्या :

शरद पवारांकडून 9 ट्विट्सची मालिका, केंद्रीय मंत्र्यांची झाडाझडती

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.