Bhandara Crime : भंडाऱ्यात ट्रकवर कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या दोघांना अटक, आरोपींमध्ये मंडळ अधिकाऱ्यासह चालकाचा सहभाग

तक्रारदार हे मोहाडी तालुक्यातील रोहा येथील रहिवासी असून त्यांचे हार्डवेअरचे दुकान असल्याने ते रेती पुरवठा करण्याचे काम करतात. भंडाऱ्याचे तहसीलदार आणि महसूल कर्मचारी यांनी 7 जून रोजी बिना रॉयल्टी रेतीची वाहतूक करताना एका ट्रकला पकडले. त्यानंतर या ट्रकला पोलीस स्टेशन वरठी येथे स्थानबद्ध केले.

Bhandara Crime : भंडाऱ्यात ट्रकवर कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या दोघांना अटक, आरोपींमध्ये मंडळ अधिकाऱ्यासह चालकाचा सहभाग
भंडाऱ्यात ट्रकवर कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या दोघांना अटक
Image Credit source: TV9
तेजस मोहतुरे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 29, 2022 | 5:08 PM

भंडारा : वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी मोबाईलवर पैशाची मागणी (Money Demand) केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना अटक (Arrest) केली आहे. मोबाईलवरील संभाषणावरून भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (Bribery Prevention Department)च्या पथकाने मंडळ अधिकारी आणि भंडाऱ्याचे तहसीलदार यांच्या वाहन चालकाला अटक केली आहे. अविनाश राठोड (44) आणि रामू नेवारे (56) असे लाच मागितल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मोहाडी तालुक्यातील तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीवरुन मंडळ अधिकारी आणि तहसीलदारांच्या चालकावर कारवाई करण्याक आली आहे.

मोबाईलवरील संभाषणाच्या आधारे लाचलुचपत विभागाची कारवाई

तक्रारदार हे मोहाडी तालुक्यातील रोहा येथील रहिवासी असून त्यांचे हार्डवेअरचे दुकान असल्याने ते रेती पुरवठा करण्याचे काम करतात. भंडाऱ्याचे तहसीलदार आणि महसूल कर्मचारी यांनी 7 जून रोजी बिना रॉयल्टी रेतीची वाहतूक करताना एका ट्रकला पकडले. त्यानंतर या ट्रकला पोलीस स्टेशन वरठी येथे स्थानबद्ध केले. यात कारवाई न करण्यासाठी मोबदला म्हणून चालक राठोड यांनी 5 हजार तर मंडळ अधिकारी नेवारे यांनी 15 हजार रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदार यास लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने भंडारा लाच लुचपत कार्यालय गाठत तक्रार नोंदविली. मोबाईलवरील संभाषणाच्या आधारे लाचेच्या मागणी केल्याप्रकरणी भंडारा लांच लुचपत विभागाने अटक केली आहे. (Two arrested for soliciting bribe for not taking action on truck in Bhandara)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें