बहिणीच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

चुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावांचा नांदेडमधील लिंबगावजवळ अपघातात मृत्यू झाला आहे. संजय गव्हाणे आणि नारायण गव्हाणे अशी अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत.

बहिणीच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Aug 15, 2019 | 7:50 PM

नांदेड : चुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावांचा नांदेडमधील लिंबगावजवळ अपघातात मृत्यू झाला आहे. संजय गव्हाणे आणि नारायण गव्हाणे अशी अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी ही दुर्देवी घटना घडल्याने परभणीतील कमळापूर गावात शोककळा पसरली आहे.

संजय गव्हाणे आणि नारायण गव्हाणे हे दोघेही आपल्या चुलत बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी मोटारसायकलने जात होते. त्याचवेळी नांदेडमधील लिंबगाव या ठिकाणी एका काराने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

संपूर्ण देशभरात आज रक्षांबधन उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र त्या दिवशी गव्हाणे कुटुंबियांवर मात्र दुखाचा डोंगर कोसळला आहे. संजय गव्हाणे आणि नारायण गव्हाणे हे दोघेही परभणीतील कमळापूर गावातील रहिवाशी होते.

दरम्यान या अपघाताप्रकरणी लिंबगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीला धडक देणाऱ्या कारलाही पोलिसांनी जप्त केले आहे. ही गाडी नेमकी कोण चालवत होतं याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.