Video: 90 वर्षांची आजी, दोन दिवस जनावरांच्या गोठ्यात, घरचेही फिरकले नाहीत, सामाजिक कार्यकर्त्यानं शेवटी दिला हात!

गेल्या वर्षापासून संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटाने घेरलं आहे. अनेकांचे घरातले, परिचयाचे लोक कोरोनाने हिरावून घेतले आहेत. (two days 90-year-old woman was lying in cowshed in Beed)

Video: 90 वर्षांची आजी, दोन दिवस जनावरांच्या गोठ्यात, घरचेही फिरकले नाहीत, सामाजिक कार्यकर्त्यानं शेवटी दिला हात!
vijaysingh
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 1:04 PM

बीड: गेल्या वर्षापासून संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटाने घेरलं आहे. अनेकांचे घरातले, परिचयाचे लोक कोरोनाने हिरावून घेतले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तिच्या घरी जाणे काय त्याची सावलीही अंगावर पडू नये म्हणून लोक खबरदारी घेत आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातही अशीच हृदयद्रावक घटना घडली आहे. (two days 90-year-old woman was lying in cowshed in Beed)

पाटोदा तालुक्यातील नाळवंडी गावातील एक संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित झालं आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र त्याच कुटुंबातील घरी असलेल्या एका 90 वर्षीय आजीही गंभीर आजारी पडल्या. परंतु घरी कोणीच नसल्याने त्यांनी कोणी दवाखान्यात उपचारासाठी नेऊ शकले नाही. तसेच वयोमानामुळे त्याही चालू शकत नसल्याने त्याही दवाखान्यात जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे दोन दिवसांपासू गंभीर अवस्थेत त्या जनावराच्या गोठयासमोर पडून होत्या. तर या कुटुंबाला कोरोनाची लागण झालेली असल्याने आजीलाहा कोरोनाची लागण झाली असावी या भीतीने शेजारीपाजारी आणि गावातील कोणीही तिच्या मदतीला आलं नाही. त्यामुळे ती अंथरुणावर अक्षरश: पडून होती.

अन् सामाजिक कार्यकर्ता धावून आला

याबाबत माहिती कळताच विजयसिंह बांगर या सामाजिक कार्यकर्त्याने आजीला हाताने उचलून स्वत:च्या गाडीतून बीड जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये भरती केलं. काही मित्रांच्या मदतीने त्याने या आजीला चादरीत गुंडाळून थेट रुग्णालयात नेले. कोरोनाची पर्वा न करता या तरुणाने आजीला हात दिला. वेळीच उपचार मिळाल्याने आजीची तब्येत आता ठणठणीत आहे. सामाजिक कार्यकर्त्याचा मदतीचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. त्याला प्रचंड लाईक्स मिळत असून बांगर यांनी दाखवलेल्या माणुसकीचं कौतुक होत आहे. बांगर यांच्या माणुसकीचं कौतुक होत असलं तरी एका वयोवृद्ध आजीला कोणीही मदत केली त्यांच्या माणुसकीचं काय? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. कोरोनाने माणुसकी गोठवली काय? असाही सवाल केला जात आहे. (two days 90-year-old woman was lying in cowshed in Beed)

संबंधित बातम्या:

Photo Story: ‘तौक्ते’चा तडाखा, मुंबईत दोन तासात 132 झाडे पडली, सी-लिंक बंद; विमानांचे उड्डाणही थांबवले

Maharashtra Coronavirus LIVE Update : देशात गेल्या 24 तासांत तब्बल 2,81,386  नवे कोरोना रुग्ण, 4,106 जणांचा मृत्यू

Covid-19: कोरोनाच्या उपचारात गेमचेंजर औषध; दिल्लीच्या ‘एम्स’ला मिळाली पहिली बॅच

(two days 90-year-old woman was lying in cowshed in Beed)

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.