ठाण्यात ऑक्सिजनअभावी दोन भव्य रुग्णालये अजूनही बंदच

ठाण्यात जवळपास हजार बेड्चे दोन कोविड इस्पितळ सज्ज असूनही, ऑक्सिजनअभावी ही रुग्णालये ठाणे पालिकेने बंद ठेवली आहेत. Two grand hospitals

  • गणेश थोरात, टीव्ही 9 मराठी, ठाणे
  • Published On - 0:41 AM, 16 Apr 2021
ठाण्यात ऑक्सिजनअभावी दोन भव्य रुग्णालये अजूनही बंदच
Two grand hospitals thane close

ठाणेः महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या मर्यादित कंपन्या असल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच आता ऑक्सिजनवर आलीय. एकीकडे कोरोना रुग्णांना इस्पितळात बेड उपलब्ध होत नाहीत, तर दुसरीकडे ठाण्यात जवळपास हजार बेड्चे दोन कोविड इस्पितळ सज्ज असूनही, ऑक्सिजनअभावी ही रुग्णालये ठाणे पालिकेने बंद ठेवली आहेत. वोल्टास आणि पार्किंग प्लाझा अशी ही दोन रुग्णालयांची नावे आहे. (Two grand hospitals in Thane are still closed due to lack of oxygen)

कोरोनाची लाट आल्यानंतर या 1100 खाटा असणारे वोल्टास रुग्णालय उभारले

रुग्णांना ऑक्सिजन मिळावा आणि हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन साठा व्हावा, यासाठी ठाणे पालिका प्रशासनाचे प्रयत्न अयशस्वी ठरलेत. वोल्टास रुग्णालयाचे काम मागील पहिल्या लाटेपासून सुरू होते, त्यानंतर कोविड काळात त्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर काम थांबवले, त्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात कोरोनाची लाट आल्यानंतर या 1100 खाटा असणारे वोल्टास रुग्णालय पूर्णपणे पुन्हा उभारले, त्याची पाहणी आठवड्यापूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

ठाणे महानगरपालिकेची दोन कोविड जंबो रुग्णालय बंदावस्थेत

ऑक्सिजनचा साठा नसल्यामुळे ठाणे महानगरपालिकेची दोन कोविड जंबो रुग्णालय बंद अवस्थेत आहेत, पार्किंग प्लाझा या ठिकाणी काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन साठा कमी असल्यामुळे 26 कोविड रुग्ण हलवण्यात आली होती. त्यानंतर या ठिकाणी विनाऑक्सिजनचे रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, तर दुसरीकडे गेल्या वर्षांपासून वोल्टास या रुग्णालयाचे काम सुरू आहे. मध्यंतरी कोरोनाची संख्या कमी झाल्यामुळे काम थांबवले होते, त्यानंतर कोरोनाच्या संख्येत वाढ झाली. तेव्हा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या ठिकाणी काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती, मात्र ऑक्सिजन पुरवठ्याअभावी  हे रुग्णालय सुरू केले गेले नाही.

तर तब्बल दोन हजार रुग्णांची व्यवस्था होणार

या दोन रुग्णालयांना नियमित ऑक्सिजनचा साठा मिळाल्यास तब्बल दोन हजार रुग्णांची व्यवस्था या ठिकाणी होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे ही सर्व गरज सरकारी कोविड रुग्णालयांची असताना शहरातील खासगी रुग्णालय यांनासुद्धा आता ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे या सर्व खासगी कोविड रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन यांना आम्हालाही लवकरात लवकर हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन उपलब्ध करून द्या, अशी मागणी पत्राद्वारे केलीय. येत्या दोन-तीन दिवसांत हा ऑक्सिजन पुरवठा नियमित सुरू झाला, तरच महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि विशेषत: कोविड रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं सावट; ताजमहालसह सर्व स्मारके 15 मेपर्यंत बंद राहणार

हरिद्वारमधील कुंभमेळ्याच्या समाप्तीची घोषणा; निरंजनी आखाड्याकडून जाहीर

Two grand hospitals in Thane are still closed due to lack of oxygen