दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक, एकाचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक, एकाचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 9:11 PM

वर्धा : वर्ध्यामध्ये एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये एकजण ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. दोन ट्रकच्या समोरासमोरील धडकेत झाल्याने अपघात घडला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. (Two trucks accident in wardha one dead and 3 injured)

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर (बोदड) ते केळापूरदरम्यान हा अपघात झाला आहे. जखमींना सावंगी इथल्या आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बारामती इथून ट्रक हा कंपनीचं नवीन अ‍ॅपे आटो रिक्षाभरून बिहार इथं जात होता. विरूद्ध दिशेने येणारा ट्रक हा रोलर घेऊन जात होता. दरम्यान, मलकापूर ते केळापूरदरम्याने दोन्ही ट्रकमध्ये भीषण अपघात घडला.

यामध्ये एकजण ठार झाला तर अन्य तीनजण जखमी झाले आहेत. अपघातात ट्रकमधील ऑटो उडून खाली रस्त्यावर पडली आणि दुस-या ट्रकमधून रोलर साखळी तोडून विरूद्ध दिशेने पडले आहेत. भर रस्त्यात असा प्रकार घडल्याने इतर वाहनांच्याही अपघाताची भीती होती.

स्थानिकांनी घडना घडताच तात्काळ पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तर एकाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस अपघाताचा पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या – 

कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअर तरुणाने केलं मुलाचं अपहरण, घाबरला अन् असा घावला पोलिसांच्या ताब्यात

मराठा आरक्षणावर तोडगा काढा, कोणतीही उणीव ठेवू नका; अशोक चव्हाणांची दिल्लीत वकिलांशी चर्चा

(Two trucks accident in wardha one dead and 3 injured)

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.