बीडमध्ये सेप्टिक टाकीत गुदमरुन दोघांचा मृत्यू, 3 कामगार अत्यवस्थ

बीड: सेप्टिक टाकी साफ करताना  दोन कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला. बीडमधील परळीच्या शिवाजीनगर इथे ही दुर्दैवी घटना घडली.  अर्जुन रमेश भालेराव आणि विशाल शिवाजी लांडगे असं मृत कामगारांची नावे आहेत. पाच कामगार सेप्टिक टाकी साफ करण्यासाठी उतरले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला, तर  तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परळी शहरातील …

बीडमध्ये सेप्टिक टाकीत गुदमरुन दोघांचा मृत्यू, 3 कामगार अत्यवस्थ

बीड: सेप्टिक टाकी साफ करताना  दोन कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला. बीडमधील परळीच्या शिवाजीनगर इथे ही दुर्दैवी घटना घडली.  अर्जुन रमेश भालेराव आणि विशाल शिवाजी लांडगे असं मृत कामगारांची नावे आहेत. पाच कामगार सेप्टिक टाकी साफ करण्यासाठी उतरले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला, तर  तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परळी शहरातील शिवाजी नगर येथील माणिक पोकळघत यांच्या घरातील सेप्टिक टाकी साफ करताना ही घटना घडली. मध्यरात्री दोन वाजल्यापासून सेप्टिक टाकी साफ करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी पहाटेच्या सुमारास दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. तर तीन जण अत्यवस्थ आहेत. दरम्यान परती इथल्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली आहे.

मॅनहोलमध्ये गुदमरुन कामगारांचा मृत्यू

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईजवळच्या डोंबिवलीत आणि त्यानंतर पनवेलमध्येही अशाचप्रकारे कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. पनवेलमध्ये ड्रेनेज साफ करण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला होता.  ड्रेनेजमध्ये उतरलेले दोन कामगार लवकर वर न आल्याने तिसरा कामगार त्यांना पाहण्यासाठी गेला, मात्र त्याचाही गुदमरून मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या 

ड्रेनेजमधील दोन कर्मचारी बाहेर न आल्याने तिसरा गेला, तिघांचाही मृत्यू 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *