ठाकरे-ठाकरेंमध्येही फरक असतो : उद्धव ठाकरे

यवतमाळ : काँग्रेस-राष्ट्रवादीला जाहिराती करुन लाज नाही का वाटत? मला त्या जाहिराती वाचतानाही लाज वाटत असल्याची टीका आघाडीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ पोस्टल ग्राऊंडवर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाच्या फुग्याला खूप भोक पडले आहेत. त्यामुळे आता हा फुगा …

ठाकरे-ठाकरेंमध्येही फरक असतो : उद्धव ठाकरे

यवतमाळ : काँग्रेस-राष्ट्रवादीला जाहिराती करुन लाज नाही का वाटत? मला त्या जाहिराती वाचतानाही लाज वाटत असल्याची टीका आघाडीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ पोस्टल ग्राऊंडवर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाच्या फुग्याला खूप भोक पडले आहेत. त्यामुळे आता हा फुगा फुगणार नाही. तुम्ही 56 काय 156 पक्ष जरी एकत्र आलात तरी भगवा फडकणारच, असं ते म्हणाले.

ठाकरे-ठाकरेमध्ये खूप फरक आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत, असं म्हणत यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार  माणिकराव ठाकरे यांच्यावरही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. मंत्री असताना काही केले नाही. पण तरीही उभे राहतात. मात्र, काही जणांना डिपॉझिट जप्त करायची हौस असते, असा टोला त्यांनी लगावला.

विरोधकांनो, आरोप करा, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शतकऱ्याबाबत बोलू नये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारींचा मोर्चा निघाला होता. गोवारी बांधवांना आज कोर्टाने न्याय दिला. मात्र काँग्रेस सरकारने तो न्याय दिला नाही. नाशिकमधून लाल बावटा घेऊन शेतकरी आले होते. मी झेंड्याचा लाल रंग नाही, त्यांच्या रक्ताचा लाल रंग बघितला आणि त्यांना मदत करण्याचे आदेश आमदार आणि मंत्र्याना दिले. पण गोवारी मोर्चावर तुम्ही केलेल्या गोळीबाराचे रक्त तुम्ही धुतले, पण जनता विसरली नाही. मला त्या घटनेची आजही लाज वाटते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

कर्जमाफीसाठी प्रयत्न केले, मात्र मला कर्जमाफी नको कर्जमुक्ती पाहिजे. माफी आरोपीला देतात. मी उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचा सुपुत्र वचन देतो की, शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण देणार हे माझं वचन असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत सांगितलं.

मत मागताना शेतकऱ्यांच्या घरात जाऊन आत्महत्या न करण्याबाबत सांगा, ‘मी आहे असे म्हणून, आधार द्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वतःला आजच पंतप्रधान समजत आहे. राहुल गांधी कलम 370 काढणार नाही म्हणतात, त्यांना लाज नाही वाटत? काश्मीरचे 370 कलम काढणार. या देशात राहायचे असेल तर देशाचे  तुकडे झाले पाहिजे म्हणणाऱ्यांचे तुकडे केले पाहिजे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केला. देशद्रोहाचा कायदा काढण्याची भाषा काँग्रेसकडून केली जाते. काही लोकांच्या दबावात हे कलम काढणारेच देशद्रोही आहेत, असंही ते म्हणाले.

भाजपसोबत युती करुन शिवसेना लाचार झाली, असं काही जण म्हणतात. पण मी देशासाठी युती केली. मला शेतीतलं कळत नाही, असे आरोप केले गेले. मला शेतीतलं कळत नाही, मात्र शेतकऱ्यांचे आश्रू कळतात, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसचे आघाडीला कळत नाहीत. 56 जणांनी एकत्र येऊन एकमुखाने पंतप्रधानांचे नाव घोषित केले तरी राज्यातील 48 जागा शिवसेना-भाजपा युतीच जिंकणार आहे. आम्हाला काही हवंय म्हणून युती केली नाही, तर आम्ही काहीतरी देण्यासाठी युती केली असल्याचं उद्धव ठाकरेंनी यवतमाळ येथील जाहीर सभेत सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *