AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस पडता पडता वाचले, उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली, थेट म्हणाले, मुख्यमंत्री बसताच… पाहा व्हिडीओ

उद्धव ठाकरे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असून यादरम्यान त्यांनी भाजपासह राज्य सरकारवर जोरदार टीका केली. हेच नाही तर उपमुख्यमंत्रिपदाबद्दल त्यांनी मोठा दावा केला.

देवेंद्र फडणवीस पडता पडता वाचले, उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली, थेट म्हणाले, मुख्यमंत्री बसताच... पाहा व्हिडीओ
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis
| Updated on: Nov 05, 2025 | 12:53 PM
Share

उद्धव ठाकरे सध्या मराठावाडा दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. कर्जमाफीच्या विषयावरून सरकारवर जोरदार टीका उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली. उद्धव ठाकरे गावागावात जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. पूर्ण कर्ज माफी झालीच पाहिजे, असे त्यांनी म्हटले. नुकताच उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, संविधानात उपमुख्यमंत्रिपदच नाहीये. सरकारचे पॅकेज आम्हाला मान्य नाहीये. ज्यावेळी मी कर्जमाफी केली त्यावेळी मी परदेशी समिती तुमच्याकडे पाठवली का? मुख्यमंत्री म्हणत आहेत की, आता जर कर्जमुक्ती केली तर बॅंकांचा फायदा होईल. मग मुख्यमंत्र्यांनी सांगावे की, जूनमध्ये कर्जमाफी केली तर बॅंकांचा कसा फायदा होणार नाही.

पुढे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, मी प्रामाणिकपणे अभ्यास न करता, मला ढ म्हणा तरीही अभ्यास न करता दोन लाखाची कर्जमाफी केली. मुख्यमंत्री बिहारला गेले आहेत बसता बसता पडले पडता पडता बसले त्यांनी पंचाग काढून बसले आहेत, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. देवेंद्र फडणवीस बिहारमधील निवडणुकीसाठी प्रचाराला गेले होते.

यादरम्यान स्टेजवरील खुर्चीवर ते बसले आणि पडता पडता वाचले. आता याचीच खिल्ली उडवताना उद्धव ठाकरे हे दिसले आहेत. देवेंद्र फडणवीस पडतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. उद्धव ठाकरे म्हणाली की, मी राजकारण करायला आलोय का तर नाही… हे संकट थांबणार की नाही याचा थागपत्ता लागत नाही. हे संकट कमी पडतंय की काय?

पाऊस एवढा येतोय की पुराचे लोंढे येत आहेत… पूर्ण सडून गेल आहे… त्यातून कोणाच्या हाती लागलं असेल तर त्याला हमीभाव मिळतोय का? मागे एक चळवळ चालू होती पण त्यांना कोपराला गूळ लावला. जुनमध्ये कर्जमाफी करायची म्हणतायत कारण त्यांना आता निवडणूक काढायची आहे. त्याच्यात धमक नाही कि जिल्हापरिषद घ्यायला निवडणुकी आदी कर्जमाफी झाल्याशिवाय त्यांना मत नाही असं सांगा, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.