
फलटण येथील शासकीय रूग्णालयात वैद्यकीय अधिकारीपदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली. आत्महत्या करण्याअगोदर त्यांनी सुसाईड नोट चक्क हातावर लिहून ठेवली. यामध्ये आरोपी पीएसआय गोपाळ बदने आणि पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्या नावाचा उल्लेख केला. फक्त उल्लेखच नाही तर पीएसआय गोपाळ बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला तर पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर हा शारिरीक आणि मानसिक छळ करत असल्याचे त्यांनी म्हटले.
फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. संपदा मुंडेने आपल्या तळहातावर नाव लिहित पीएसआय गोपाळ बदने आणि पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केली. संपदा मुंडेंच्या आत्महत्येनंतर काही तासात पोलिसांनी पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर याला अटक केली. त्याला त्याच्या राहत्या घरातूनही पोलिसांनी अटक केली. आरोपी पीएसआय काही तास फरार होता, शेवटी रात्री उशिरा तो पोलिसांना शरण आला.
संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचे प्रकरण तापलेले असतानाच राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनी मोठे भाष्य केले. उज्ज्वल निकम म्हणाले की, खरोखरच एखाद्या महिला वैद्यकीय अधिकारीला अशाप्रकारे हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या करावी लागतंय तर हे दुर्दैवी आहे. या प्रकरणात सखोल चाैकशी व्हायला हवी. स्वत: तिने हातावर लिहून आत्महत्या करणे म्हणजे नक्कीच धक्कादायक आहे. फलटणच्या घटनेबाबत पोलीस तपास सुरू झाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित देखील केल आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. सातारा पोलीस लवकरच सखोल चौकशी करतील आणि आरोपींविरुद्ध आरोप पत्र दाखल करतील, असेही उज्ज्वल निकम यांनी म्हटले. पुढे बोलताना उज्वल निकम राजीव देशमुख यांच्या निधनावर बोलताना म्हणाले, राजीव देशमुख हे माझे परमस्नेही अनिल देशमुख यांचे चिरंजीव होते. अल्पवयात राजीव दादांचा दुःखद निधन होणे ही मी माझी वैयक्तिक हानी समजतो.
समाजात सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना फार कमी अशा व्यक्ती असतात, ज्यांना आजाद शत्रू म्हणून ओळखला जाते. राजीव देशमुख हे एक आझाद शत्रू होते. त्यांनी या जळगाव जिल्ह्यात आपल्या वागण्याने बोलण्याने या जळगाव जिल्ह्यात तरुण कार्यकर्ता म्हणून एक वेगळी छाप पाडली होती. त्यांच्या निधनाने त्यांच्या परिवाराची हानी झालीच आहे, परंतु जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीची हानी झाली आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून राजीव देशमुख हे कार्य करत राहिले. चाळीसगाव तालुक्याला देखील हा मोठा धक्का आहे, परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.