राज्यात अवकाळीचा तडाखा सुरुच, इचलकरंजीत घरांमध्ये पाणी घुसले, देशाच्या बहुतांश भागांत पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

आज बुलढाणा, पुणे, बीड, इचलकरंजीत पावसाने जोरदार हजेरी लावली. इचलकरंजीत घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना नाहक त्रास झाला. तर महावितरणचे खांब कोसळल्याने तासभर वीज नव्हती. (Untimely rain continues in the state, water seeps into houses in Ichalkaranji)

राज्यात अवकाळीचा तडाखा सुरुच, इचलकरंजीत घरांमध्ये पाणी घुसले, देशाच्या बहुतांश भागांत पुढील पाच दिवस पावसाचा इशारा
मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 10:16 PM

मुंबई : गेले पाच-सहा दिवस राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. कुठे गारांचा पाऊस पडत आहेत, तर कुठे हलक्या बरसतायत. मात्र यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता असल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. पावसामुळे रब्बी पिके, भाजीपाला, फळबागा यांचे अतोनात नुकसान होत आहे. आज बुलढाणा, पुणे, बीड, इचलकरंजीत पावसाने जोरदार हजेरी लावली. इचलकरंजीत घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना नाहक त्रास झाला. तर महावितरणचे खांब कोसळल्याने तासभर वीज नव्हती. (Untimely rain continues in the state, water seeps into houses in Ichalkaranji)

इचलकरंजीत घरांमध्ये पाणी घुसले

इचलकरंजी शहरामध्ये विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड झाली, तर काही ठिकाणी घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. पाऊस पडल्यामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला असून यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वादळी वारा व पावसामुळे काही घरांचे नुकसान झाले आहे. सांगली रोडवरील एका नारळाच्या झाडावर वीज पडून नारळाच्या झाडाला मोठी आग लागली. पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे सर्कल भागांमध्ये पाणी साचले होते. यामध्ये विकली मार्केट, शाहू पुतळा, कुडचे मळा, गांधी विकास नगरमधील काही घरांमध्ये पाणी शिरले. वाहनधारकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पावसामुळे शहरातील तासभर वीज गायब होती. महावितरणचे विजेचे खांब मोडून पडले आहेत.

बुलढाण्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी

बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर , जळगाव जामोद तालुक्यात आज सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कालपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते. आज सकाळी 5 वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावारणात गारवा निर्माण झालाय आणि वातावरण आल्हददायक झालंय, मात्र यामुळे शेतात असलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

बीडमध्ये तुरळक सरी

बीड जिल्ह्यात दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. माजलगाव तालुक्यातील लोणगाव परिसरात गारांचा पाऊस झाला, त्यामुळे हाती आलेल्या गहू आणि बाजरीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

पुण्यातही जोरदार पाऊस

पुणे शहरात संध्याकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. डेक्कन, शिवजीनगर, पुणे स्टेशन परिसरात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली.

पुढील पाच दिवस देशाच्या बहुतांश भागात पावसाचा इशारा

देशाच्या अनेक भागांत एकीकडे उष्म्याने कहर केला आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने प्रचंड हैराण झाले आहेत. अशातच विविध राज्यांत पुढील पाच दिवसांत वादळी-वार्‍यासह पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या विविध भागांत पुढील पाच दिवसांत पाऊस कोसळणार असल्याचा अ‍ॅलर्ट दिला आहे.

या पाच दिवसांत विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वाराही सुटेल. वादळीवार्‍यासह हजेरी लावणार्‍या पावसाच्या तडाख्याने उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भिती आहे. अवकाळी पावसाच्या हजेरीवेळी वार्‍याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर इतका असेल. पश्चिमी हिमालयीन क्षेत्रात पश्चिमी विक्षोभ उत्पन्न होत आहे. हा पश्चिमी विक्षोभ 14 एप्रिलपासून 17 एप्रिलपर्यंत वातावरणावर परिणाम करेल, असे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या तटीय क्षेत्रातही पावसाची शक्यता आहे. राजधानी दिल्लीमध्ये 16 एप्रिलपासून उकाड्यापासून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. दिल्लीच्या काही भागांत पुढील आठवड्यात हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Untimely rain continues in the state, water seeps into houses in Ichalkaranji)

इतर बातम्या

कोरोनाच्या विळख्यात दागिने आणि रत्नांचा व्यवसाय; निर्यातीत 25% घट

India Corona Update : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, कोरोना लसीसह अन्य महत्वाच्या मागण्या

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.