Maharashtra News Live Update : पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला
विनायक मेटे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Image Credit source: TV9

| Edited By: शुभम कुलकर्णी

Aug 16, 2022 | 7:24 AM

आज दिनांक 15 ऑगस्ट 2022  आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. सर्वत्र नागरिकांमध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह दिसून येत आहे. ऐतिहासिक स्थळावर स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्ष अशी सजावट करण्यात आली आहे. तसेच गेले दोन दिवस पावसाने विश्रांती दिली होती. मात्र आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्ह्यात  मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्याच्या इतर भागात देखील पाऊस सुरूच आहे. दरम्यान दुसरीकडे रविवारी मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या घडामोडी आज देखील घडण्याची शक्यता आहे. या सर्व बातम्यांचा आढावा आपण आज घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 15 Aug 2022 06:50 PM (IST)

  पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

  पुणे : पुण्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे खडकवासला धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.  धरणाच्या सांडव्यातून सुरू असणारा 13981 क्युसेक इतका विसर्ग वाढवला आहे. पावसाचा जोर बघता विसर्ग आणखी वाढवला जाण्याची दाट शक्यता आहे.  नदीकाठच्या सर्वांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 • 15 Aug 2022 04:57 PM (IST)

  विनायक मेटेंची लढाई व्यर्थ जाऊ देणार नाही, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

  विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं. मराठा आरक्षणासंबंधित बैठकीसाठी येत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. हा आघात केवळ मेटे कुटुंबावरच नाही तर संपूर्ण मराठा समाजावर आहे. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी केलेला लढा वाया जाऊ देणार नाही. मराठा आरक्षणासाठी जे जे करावं लागेल ते सर्व हे सरकार करेल, अशं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांच्या कार्यकर्त्यांना आणि संपूर्ण मराठा समाजाला दिलं आहे.

 • 15 Aug 2022 04:47 PM (IST)

  विनायक मेटे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेते उपस्थित

  शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बीडमध्ये त्यांचे हजारो चाहते आणि समर्थक उपस्थित आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री अब्दुल सत्तार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर यांच्यासह राज्यातील आणि बीड जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित आहेत.

 • 15 Aug 2022 04:37 PM (IST)

  लाडक्या नेत्याचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी हजारोंची गर्दी, साश्रू नयन आणि 'अमर रहे'च्या घोषणा

  विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या लाखो कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आपल्या लाडक्या नेत्याचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी आज बीडमध्ये हजारो चाहते आणि कार्यकर्ते दाखल झाले आहेत. विनायक मेटे अमर रहे च्या घोषणा दिल्या जात आहेत. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत. अशा वातावरणात विनायक मेटे यांना अखेचा निरोप दिला जात आहे.

 • 15 Aug 2022 04:29 PM (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विनायक मेटेंना श्रद्धांजली

  शिवसंग्रामचे नेते आणि मराठा आरक्षणासाठी आपलं आयुष्य वेचणारे नेते विनायक मेटे यांच्यावर आज बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक आपल्या नेत्याचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी बीडमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बीडमध्ये येत विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 • 15 Aug 2022 04:22 PM (IST)

  मराठवाड्यातील लढवय्या नेता अनंतात विलीन, विनायक मेटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

  मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अरबी समुद्रातील पुतळा या दोन मुद्द्यांवर आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारा मराठवड्यातील लढवय्या नेता अनंतात विलीन झालाय. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 • 15 Aug 2022 04:12 PM (IST)

  औरंगाबादच्या कीन्हळ फाट्यावर अपघात; 35 ते 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बस पलटली

  औरंगाबादच्या कीन्हळ फाट्यावरील अपघात झाला आहे. 35 ते 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बस पलटली आहे. परिवहन महामंडळाच्या बसला हा अपघात झाला आहे. दुपारी दोनच्या सुमारास ही बस शिऊरवरून औरंगाबादला निघाली असताना बस कीन्हळ फाट्याजवळ अचानक पलटी झाली. पावासामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने  चालकाचा नियंत्रण सुटल्याने बस स्लीप होऊन पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. किरकोळ दुखापत झाली असली तरी बस मधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

 • 15 Aug 2022 03:59 PM (IST)

  मध्यान्ह भोजनात निकृष्ट अन्न; आमदार बांगर यांनी व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली

  मध्यान्ह भोजनात निकृष्ट अन्न देण्यात आले. यामुळे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजन देणाऱ्या उपहारगृहाच्या व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली.

 • 15 Aug 2022 02:44 PM (IST)

  गोंदिया जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर, 200 गावांचा संपर्क तुटला  

  गोंदिया जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर

  हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

  200 गावांचा संपर्क तुटला

 • 15 Aug 2022 02:17 PM (IST)

  धक्कादायक! औरंगाबाद जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

  औरंगाबाद जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी केला बलात्कार

  बलात्कारप्रकरणी 6 आरोपींना अटक

  आरोपींना 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

 • 15 Aug 2022 01:53 PM (IST)

  शिंदे गटाची काळजी वाटते; मंत्रिमंडळ खाते वाटपावर बाळासाहेब थोरातांची खोचक प्रतिक्रिया

  40  दिवस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी लागले, त्यानंतर खाते वाटपात काही दिवस गेले

  खाते वाटपात शिंदे गटाच्या वाट्याला जी खाती आली आहेत ते बघून काळजी वाटते

  काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला

  खाते वाटप झालंय आता मंत्र्यांना कामासाठी शुभेच्छा - थोरात

 • 15 Aug 2022 01:28 PM (IST)

  महिला सन्मानाची सुरुवात महाराष्ट्रातून करा, प्रियंका चतुर्वेदींचा मोदींना टोला

  महिला सन्मानाची सुरुवात महाराष्ट्रातून करा

  महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान नाही

  मोदींच्या महिला सन्मान घोषणेवर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींची प्रतिक्रिया

 • 15 Aug 2022 12:58 PM (IST)

  विनायक मेटेंच्या अंत्ययात्रेला सुरुवात, कार्यकर्त्यांची गर्दी

  विनायक मेटेंच्या अंत्ययात्रेला सुरुवात

  कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

  विनायक मेटे यांना आज अखेरचा निरोप

  रविवारी अपघातात झाले दुर्दैवी निधन

 • 15 Aug 2022 12:53 PM (IST)

  अमरावतील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार, चार जणांच्या मुसक्या आवळल्या

  अमरावतील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

  चार जणांच्या मुसक्या आवळल्या

  आरोपींनीही पोलिसांवर रोखले पिस्तूल

  हवेत गोळीबार करून पोलिसांचे प्रत्युत्तर

  चार आरोपींना  केली अटक

 • 15 Aug 2022 12:21 PM (IST)

  मंत्रिमंडळाचे खाते वाटप झाले हे महत्त्वाचे, भुजबळांचा नव्या सरकारला टोला

  मंत्रिमंडळाचे खाते वाटप झाले हे महत्त्वाचे

  शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न कोणाला सांगायचे हा एक मोठा प्रश्न होता

  मंत्रिमंडळ खातेवाटपावर भुजबळांची प्रतिक्रिया

  ज्यांना जे खातं मिळालं आहे त्यांनी त्यात काम करून दाखवावे - भुजबळ

  शिंदे गटातील अनेकांचा दावा आम्ही सत्तेसाठी आलो नाही, मग आता रडता कशाला?

  भुजबळांचा खोचक टोला

 • 15 Aug 2022 11:59 AM (IST)

  पुन्हा पाणीपुरवठा खातं मिळाल्याने आनंद - गुलाबराव पाटील

  स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस अगोदर नव्या सरकारचे खाते वाटप झाले आणि माझे पूर्वीचेच खाते मला मिळाले त्यामुळे आनंद झाला आहे. माझी सेकंड इनिंग सुरू होत असल्याने जलजीवन मिशन अंतर्गत 34 हजार गावांना पाणीपुरवठा करण्याचा एक मोठा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला असून, त्यामुळे गावाचा पाणीप्रश्न कायमचा निकाली निघणार असल्याची भावना मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

 • 15 Aug 2022 11:48 AM (IST)

  थोड्याचवेळात होणार विनायक मेटेंच्या अंत्ययात्रेला सुरुवात

  विनायक मेटे यांचं रविवारी कार अपघातात निधन झालं. मुंबई - पुणे महामार्गावर हा अपघात घडला. दरम्यान आज दुपारी 12 वाजता विनायक मेटे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. मेटे यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या आहेत. कार्यकर्त्यांनी बीडमध्ये गर्दी केली आहे.

 • 15 Aug 2022 11:16 AM (IST)

  कोकणात रोजगारासाठी धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प आवश्यक - सामंत

  कोकणात रोजगारासाठी धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प आवश्यक - सामंत

  स्थानिक आमदार राजन साळवी यांचा देखील प्रकल्पाला पाठिंबा  - सामंत

  मात्र खासदार विनायक राऊत का विरोधात भूमिका घेत आहेत माहित नाही - सामंत

  मंत्रिमंडळ खातेवाटपावरून आमच्यात मतभेद नाहीत

  शिवसेनेच्या आरोपांवर उदय सामंत यांची स्पष्टीकरण

 • 15 Aug 2022 10:34 AM (IST)

  तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्रंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी

  नाशिक :  तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्रंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी

  धार्मिकदृष्ट्या श्रावणातील तिसऱ्या सोमवारला अत्यंत महत्त्व

  त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी

 • 15 Aug 2022 10:10 AM (IST)

  राज्यपालांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या विविध पुरस्कारांचे वितरण

  राज्यपालांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या विविध पुरस्कारांचे वितरण

  पुण्याचा आज खूप विकास झाला आहे - राज्यपाल

  मला नेहमीच प्रश्न पडतो पुण्यात राहावे की डेहराडूनला - राज्यपाल

  मोदींच्या सरकारला आज आठ वर्षे पूर्ण झाली कुठल्याच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत - राज्यपाल

  पंतप्रधान मोदींनी दिलेल्या सूत्रांचे पालन केल्यास आपण खूप पुढे जाऊ

 • 15 Aug 2022 09:52 AM (IST)

  खाते वाटप हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय, बावनकुळेंचे शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर

  खाते वाटप हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय, बावनकुळेंचे शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर

  उद्धव ठाकरे हे नैराश्यातून बोलत आहेत, मुख्यमंत्रीच ठरवतात कोणाला कोणतं खातं द्यायचं - बावनकुळे

  एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक नेत्यांना त्यांच्या त्यांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आणि अनुभवानुसार खाती दिली - बावनकुळे

  भाजप तुपाशी, शिंदे गट उपाशी अशी सामनामधून करण्यात आली होती टीका

 • 15 Aug 2022 09:30 AM (IST)

  भाजप तुपाशी, शिंदे गट उपाशी; खातेवाटपावरून सामनातून टोलेबाजी

  भाजप तुपाशी, शिंदे गट उपाशी

  खातेवाटपावरून सामनातून शिवसेनेचा शिंदे गटाला टोला

  भाजपनं चांगली खाती आपल्याकडे ठेवली - सामना

 • 15 Aug 2022 08:49 AM (IST)

  नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात

  नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात

  पहाटेपासून जोरदार पाऊस

  नदी, नाल्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ

  अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका

 • 15 Aug 2022 07:40 AM (IST)

  अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

  अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

  हाणामारीचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद

  12 ऑगस्ट रोजीची घटना, हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

  शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन कार्यकर्ते आपसांत भिडल्याने परिसरात चर्चेला ऊधाण

 • 15 Aug 2022 07:14 AM (IST)

  'गोसिखुर्द'मधून विसर्ग वाढवला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस

  गोसिखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

  वैनगंगा नदी पोहोचली इशारा पातळीवर

  नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  हवामान खात्याकडू यलो अलर्ट

 • 15 Aug 2022 06:40 AM (IST)

  नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाला तिरंग्याची विद्युत रोषणाई

  नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाला तिरंग्याची विद्युत रोषणाई

  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सजली नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत

  विद्युत रोषणाई पहाण्यासाठी  नागरिकांची गर्दी

Published On - Aug 15,2022 6:35 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें