ये भाई जरा देख के करो...उघड्यावर मूत्रविसर्जनाने नागपूरकर त्रस्त

नागपूर: लघुशंका  नैसर्गिक कॉल आहे, पण तरीही लघुशंका कुठे करावी, याची मात्र काही बंधनं आहेत. उपराजधानीत ही बंधनं सैल झाली आहेत. नागपुरात रोज हजारो लोकं उघड्यावर लघुशंका करतात. सध्या हीच नागपूर महानगरपालिकेची सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. कारण स्वच्छ नागपूर अभियानात उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांचा सर्वात मोठा रोडा आहे. ये भाई जरा देख के…. आगे भी नही …

ये भाई जरा देख के करो...उघड्यावर मूत्रविसर्जनाने नागपूरकर त्रस्त

नागपूर: लघुशंका  नैसर्गिक कॉल आहे, पण तरीही लघुशंका कुठे करावी, याची मात्र काही बंधनं आहेत. उपराजधानीत ही बंधनं सैल झाली आहेत. नागपुरात रोज हजारो लोकं उघड्यावर लघुशंका करतात. सध्या हीच नागपूर महानगरपालिकेची सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. कारण स्वच्छ नागपूर अभियानात उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांचा सर्वात मोठा रोडा आहे.

ये भाई जरा देख के…. आगे भी नही पिछे भी नही…नागपूर महानगरपालिकेवर सध्या हेच गीत गाण्याची वेळं आलीय… कारणसंत्रानगरी नागपुरात दिवसेंदिवस उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सार्वजनिक परिसरात एक हजारपेक्षा जास्त ठिकाणांवर लोक सर्रास उघड्यावर लघुशंका करतात. नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छ नागपूर अभियानात हीच सर्वात मोठी अडचण आहे.

स्वच्छ नागपूर अभियानात गेल्या काही वर्षांत संत्रानगरी मागे पडत आहेत. यावेळेस ही बाब नागपूर महानगरपालिकेनं चांगलीच मनावर घेतलीय, आणि पुन्हा एकदा स्वच्छ नागपूर मिशन सुरु झालं. पण यात मनपाची सर्वात मोठी डोकेदुखी ठरतायत ते उघड्यावर मूत्रविसर्जन करणारे लोक. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनीही ही बाब मान्य केली आहे. पण यांना आवरायचं कसं हाच सर्वात मोठा प्रश्न आहे.

उघड्यावर लघुशंका करणारे सध्या नागपूर महानगरपालिकेसाठी सर्वात मोठी डोकेदुखी आहे. यावर उपाय म्हणून नागपूर महानगरपालिकेनं लष्करातील 40 निवृत्त जनावांचा स्कॉड तयार केलं आहे. आणि प्रत्येक झोनमध्ये कारवाई सुरु केली आहे. नागपूर शहरातील मनपाच्या 10 झोनमध्ये आतापर्यंत उघड्यावर मूत्रविसर्जन करणाऱ्या 1070 लोकांवर कारवाई केली आहे. यांच्याकडून 1लाख56 हजार 300 रुपयांचा  दंडंही वसूल केला आहे. पण दंड करुन ही समस्या सुटणार नाही. तर लोकसंख्येच्या प्रमाणात मुतारी आणि शौचालयं तयार करण्याची आज खरी गरज आहे. तेव्हाच मनपाची ही डोकेदुखी कमी होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *