विधिता आणि पूर्वशी धन्यवाद! शिवसेना प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकरांनी राऊतांच्या कन्यांचे मानले आभार

उर्मिला यांनी विधिता आणि पूर्वशी राऊत यांचे इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत आभार मानले आहेत (Urmila Matondkar thanks to Sanjay Raut Daughters).

विधिता आणि पूर्वशी धन्यवाद! शिवसेना प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकरांनी राऊतांच्या कन्यांचे मानले आभार
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 2:43 PM

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या कन्या विधिता आणि पूर्वशी राऊत यांचे आभार मानले आहेत. उर्मिला यांनी काल (1 डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, पक्षप्रवेशानिमित्ताने संजय राऊत यांच्या दोन्ही मुलींनी उर्मिला यांचा सांज श्रृंगार केला होता. त्यानिमित्ताने उर्मिला यांनी विधिता आणि पूर्वशी यांचे इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत आभार मानले आहेत (Urmila Matondkar thanks to Sanjay Raut Daughters).

View this post on Instagram

A post shared by Urmila Matondkar (@urmilamatondkarofficial)

विधिता आणि पूर्वशी यांचा ‘अलमारी’ हा डिझायनिंग स्टुडिओ आहे. विधिता कॉस्च्युम डिझाईन करतात, तर पूर्वशी ज्वेलरी डिझाईन करतात. विधिता आणि पूर्वशी गेल्या चार वर्षांपासून या क्षेत्रात आहेत. उर्मिला यांचा कालचा पेहराव विधिता यांनी तयार केला होता, तसंच आभूषणे पूर्वशी यांनी तयार केली होती.

तसंच उर्मिला मातोंडकर यांचा आजचा पेहराव आणि आभूषणेही विधिता आणि पूर्वशी यांनीच डिझाईन केली होती. उर्मिला आज (2 डिसेंबर) शिवसेना भवनात आल्या होत्या (Urmila Matondkar thanks to Sanjay Raut Daughters).

सध्या सुरू असलेल्या बिग बॉस या रिऍलिटी शो मधील काही सेलिब्रेटी स्पर्धकांसाठीही विधिता आणि पूर्वशी कॉस्च्युम आणि ज्वेलरी डिझायनींगचे काम करतात. बॉलिवूड आणि विविध क्षेत्रातील सेलेब्रिटी विधिता आणि पूर्वशी यांनी डिझाईन केलेले कपडे आणि आभूषणे वापरतात.

दरम्यान, विधान परिषदेत शिवसेनेचा आवाज उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने अधिक बुलंद होणार आहे. अभिनेत्री कंगना रनौतने शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेवर हल्लाबोल चढवला असताना उर्मिला यांनी ठाम भूमिका घेत कंगना सुनावलं होतं. त्यानंतर काही महिन्यातच उर्मिला मातोंडकर यांना खुद्द उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेची ऑफर दिली.

उर्मिला मातोंडकर यांचे वक्तृत्त्व, मराठी चेहरा, लोकप्रियता, सर्व भाषांवर प्रभुत्व, राजकीय समज आणि राज्यपाल नियुक्त सदस्यपदासाठी कलाकार कोट्याचे निकष पूर्ण करण्याची क्षमता लक्षात घेऊन शिवसेना त्यांना विधानपरिषेदवर पाठवल्याचं म्हटलं आहे. एक वाजता पक्षप्रवेशाची ठरलेली वेळ अचूक पाळून उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या टायमिंगचीही चुणूक दाखवली. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ‘मराठी मुलगी’ मराठी माणसाच्या अस्मितेसाठी काम करेल, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.

संबंधित बातमी : उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला रामराम, कारण…

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.