Achyut Usgaonkar Dies | अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पितृशोक, गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन

गोवा मुक्तीनंतर अधिकारावर आलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात अच्युत उसगावकर हे मंत्री होते (Varsha Usgaonkar Father Maharashtrawadi Gomantak Party Leader Achytut Usgaonkar Dies)

Achyut Usgaonkar Dies | अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पितृशोक, गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन
Follow us
| Updated on: Jun 16, 2020 | 12:33 PM

पणजी : प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पितृशोक झाला. वर्षा उसगावकर यांचे वडील आणि गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे मंगळवारी गोव्यात निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Varsha Usgaonkar Father Maharashtrawadi Gomantak Party Leader Achytut Usgaonkar Dies)

अच्युत उसगावकर हे मिरामार येथे राहत होते. वयोमानापरत्वे जडलेल्या आजारांमुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. र्यांच्या पश्चात वर्ष उसगावकर यांच्यासह तीन कन्या आहेत.

गोवा मुक्तीनंतर अधिकारावर आलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात अच्युत उसगावकर हे मंत्री होते. गोव्याची पोर्तुगीज राजवटीतून 1962 साली मुक्तता झाली व मग महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सत्तेचा काळ सुरु झाला. हा पक्ष सतरा वर्षे सत्तेत होता. उसगावकर हे मगो पक्षाचे नेते होते.

हेही वाचा : Madhav Patankar Dies | रश्मी ठाकरे यांना पितृशोक, माधव पाटणकर यांचे निधन

आमदार व मंत्री म्हणून सत्तरच्या दशकात उसगावकर यांनी भरपूर लोकोपयोगी कामे केली. मंत्री म्हणून काम करण्यापूर्वी अच्युत उसगावकर यांनी दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर यांच्या नेतृत्वात सरकार असताना गोव्याचे उपसभापती म्हणून काम केले.

आधी भाऊसाहेब बांदोडकर व नंतर त्यांची कन्या स्वर्गीय शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर मंत्री होते. काकोडकर सरकारमध्ये त्यांनी 13 ऑगस्ट 1977 ते 27 एप्रिल 1979 या काळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले.

अच्युत उसगावकर यांची प्राणज्योत मालवल्याचे कळताच गोव्यातील विविध समाज घटकांत दु:ख व्यक्त होत आहे.

(Varsha Usgaonkar Father Maharashtrawadi Gomantak Party Leader Achytut Usgaonkar Dies)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.