वसई-विरार महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा; निवडणूक आयोगाचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस समीर वर्तक यांनी प्रारूप प्रभाग रचण्यावर दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे.

वसई-विरार महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा; निवडणूक आयोगाचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

वसई विरार : निवडणूक आयोगाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत वसई-विरार महापालिकेचा निवडणुकीचा मार्ग मोकळा करून दिला आहे. त्यामुळे आता वसई-विरार महापालिकेची निवडणूक केव्हाही लागण्याची शक्यता आहे. ( Vasai-Virar Municipal Corporation Elections)

विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस समीर वर्तक यांनी प्रारूप प्रभाग रचण्यावर दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. प्रारूप प्रभाग रचण्यावरील याचिका मागे घेतलेली आहे, आता पूर्ण झालेल्या प्रभाग रचनेवर पुन्हा हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे समीर वर्तक म्हणाले आहेत.

प्रभाग रचना, भौगोलिक रचना, लोकसंख्येतील फरक यावर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली असून, मतदार यादी बनविण्याचे काम सुरू असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेत आयुक्त आणि लोकप्रतिनिधींमध्ये खटके उडत होते. त्यामुळे वसई-विरार महापालिकेवर प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली होती. वसई विरार महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरु झाली आहे. 28 जून रोजी लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने महापालिकेचे प्रशासक म्हणून गंगाथरण डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

115 सदस्य संख्येच्या वसई विरार महापालिकेत 109 नगरसेवक असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. मात्र या महापालिकेचा गाडा पहिल्यांदाच प्रशासक हाकणार आहेत. वसई विरारमध्ये ‘कोरोना’चे संकट वाढत असताना जुन्या अधिकाऱ्यांच्या बदलीने महापालिका कामाच्या नियोजनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. रमेश मनाळे यांना गेल्या दोन वर्षांपासून वसई विरार महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव होता. वसई विरार महापालिकेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि नऊपैकी चार प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त हे सर्वच नवीन आहेत. त्यामुळे कोरोना संकटात प्रशासकीय अडथळे येण्याची भीती वर्तवली जात होती.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

‘बविआ’ची एकहाती सत्ता असलेल्या वसई विरार महापालिकेवर प्रशासकीय राजवट

वसई विरार महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांची बदली, रमेश मनाळेंनीच विनंती केल्याची चर्चा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *