…तर भाजी मार्केट एक-दोन दिवसात बंद करणार, मुंबईच्या पालकमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

अनेकजण खोटी माहिती देऊन पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत रस्त्यावर फिरत आहे. त्यामुळेच पोलिसांनी आता कलर कोड लावण्याचे आदेश दिले आहे. Guardian Minister Mumbai Aslam Shaikh

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:15 PM, 17 Apr 2021
...तर भाजी मार्केट एक-दोन दिवसात बंद करणार, मुंबईच्या पालकमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

मुंबईः भाजी मार्केटमध्ये गर्दी होते. ती मार्केट एक, दोन दिवसांत बंद करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांना दिल्या आहेत, असंही मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Mumbai Guardian Minister Aslam Shaikh) म्हणालेत. शासनातर्फे संबंधित नियमावली जारी केलीय. मात्र अनेकजण खोटी माहिती देऊन पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत रस्त्यावर फिरत आहे. त्यामुळेच पोलिसांनी आता कलर कोड लावण्याचे आदेश दिले आहे, असंही त्यांनी सांगितलंय. (Vegetable Market Will Be Closed In a Day Or Two, Big Statement From The Guardian Minister Of Mumbai Aslam Shaikh)

अन्यथा पूर्ण लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. अन्यथा पूर्ण लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही. रेल्वेदेखील येत्या काळात प्रवाशांसाठी काही गाईडलाईन्स काढण्यात येण्याची शक्यता आहे. वारंवार सरकार सांगताय नियमांचं पालन करा, मात्र नागरिक ऐकत नाहीत, असंही मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणालेत.

अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी कलर कोड

मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांना कलर कोड दिला जाणार आहे. शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. गाड्यांमधील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत आहेत का? याची तपासणी करण्यात येणार आहे. पोलीस, महानगरपालिका, पत्रकार, डॉक्टर अशाप्रकारे पोस्टर लावून कोणी फायदा घेत आहे का? याचीही पडताळणी केली जाणार आहे.

कलर कोड नेमका कशा प्रकारे?

वैद्यकीय कर्मचारी यांच्या गाड्यांसाठी लाल रंग, भाजीपालाच्या गाडीसाठी हिरवा रंग, इतर अत्यावश्यक सेवासाठी पिवळा रंग असणार आहे. अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांना 6 इंच गोल सर्कल लावण्याच्या सूचना पोलीस आयुक्त यांनी दिल्या आहेत. मुंबई पोलिसांकडून लवकरच नव्या गाईडलाईन्स जारी केल्या जाणार आहेत. सीआरपीसी 144 अंतर्गत नव्या गाईडलाईन्स जारी केल्या जाणार आहेत.

लोकलसाठीही कलर कोड?

मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन सध्या फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहे. मात्र, तरीही काही नागरिक नियमांचं उल्लंघन करुन लोकल प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आता लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कलर कोडचा वापर करुन तिकीटचा पास देण्याचा निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

‘देश जळतोय अन् ‘आधुनिक निरो’ प्रचारात मग्न’; कोरोना, औषध टंचाईवरुन काँग्रेसचा मोदींवर निशाणा

मोदी सरकारने Remdesivir केले स्वस्त, कोरोना रुग्णांना मोठा दिलासा

Vegetable Market Will Be Closed In a Day Or Two, Big Statement From The Guardian Minister Of Mumbai Aslam Shaikh