VIDEO: दुचाकी उचलली म्हणून फिल्मी स्टाईलने व्यापारी रस्त्यावरच झोपला

नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी उचलली म्हणून एक व्यापारी चक्क टोईंग व्हॅनसमोरच झोपल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • अजय शर्मा, टीव्ही 9 मराठी, उल्हासनगर
  • Published On - 15:21 PM, 23 Jun 2019
VIDEO:  दुचाकी उचलली म्हणून फिल्मी स्टाईलने व्यापारी रस्त्यावरच झोपला

उल्हासनगर : आपण बाहेर फिरायला गेल्यानंतर गाडी सहजतेने रस्त्याच्या शेजारी लावतो. मात्र काही वेळाने गाडी टो केली जाते. त्यानंतर आपण नियमाप्रमाणे पोलीस ठाण्यात जाऊन दंड भरुन आपली गाडी घेऊन येतो. पण नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी उचलली म्हणून एक व्यापारी चक्क टोईंग व्हॅनसमोरच झोपल्याचा प्रकार समोर आला आहे. उल्हानगरात ही फिल्मी घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर 3 या ठिकाणाहून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर एका व्यापाऱ्याने दुचाकी लावली होती. मात्र काही वेळाने ट्राफिक पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन त्याची दुचाकी टोईंग केली. आपली गाडी टोईंग केली हे त्या व्यापाराला कळताच तो फिल्मी स्टाईलने रस्त्यावर झोपला आणि टोईंग व्हॅनची वाट अडवली. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला.

या प्रकारानंतर त्या व्यापाराने पोलिसांसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यानंतर ट्राफिक पोलिसांनी तात्काळ त्याची टो केलेली दुचाकी खाली उतरवत सोडून दिली. या प्रकारामुळे रस्त्यावर बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती.

दरम्यान गेल्या महिन्याभरात ट्राफिक पोलीस आणि व्यापारी यांच्या दुचाकी टो करण्यावरुन हाणामारीच्या घटना घडल्या आहे. त्यानंतर आता हा प्रकार समोर आल्यानंतर ट्राफिक पोलिसांना दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत आहे.

पाहा व्हिडीओ :