ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांचं निधन

सोलापूर : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांचे आज पहाटे सव्वापाच वाजता निधन झाले. पवार हे साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक होते. मराठी समीक्षेमध्ये विनोदाची सैद्धांतिक मिमांसा करणारे गो. मा. पवार हे पहिले समीक्षक ठरले. त्यांच्या निधनावर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. डॉ. गो. मा. पवार यांचा संक्षिप्त परिचय गो. मा. पवार हे […]

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांचं निधन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

सोलापूर : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांचे आज पहाटे सव्वापाच वाजता निधन झाले. पवार हे साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक होते. मराठी समीक्षेमध्ये विनोदाची सैद्धांतिक मिमांसा करणारे गो. मा. पवार हे पहिले समीक्षक ठरले. त्यांच्या निधनावर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

डॉ. गो. मा. पवार यांचा संक्षिप्त परिचय

गो. मा. पवार हे मराठी साहित्याचे व्यासंगी समीक्षक होते. त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवनकार्य आणि साहित्याच्या संदर्भात विशेष अभ्यास केला. प्रा. पवार यांचा जन्म 13 मे 1932 ला सोलापूर जिल्ह्यातील पानगाव येथे झाला. शालेय शिक्षण नरखेड येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण हरिभाई देवकरण महाविद्यालयामध्ये झाले. त्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मराठी विषयात एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून त्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर अध्यापनाच्या क्षेत्रात 33 वर्षे काम केले. यात अमरावती येथील शासकीय महाविद्यालय, औरंगाबाद आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथेही अध्यापनाचे काम केले. 1992 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सोलापूर हीच कर्मभूमी मानून त्यांनी विपूल साहित्य निर्मिती केली.

पवार यांनी मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावरही काम केले. त्यांनी आत्तापर्यंत 16 ग्रंथाचे लेखन केले असून 60 शोधनिबंध सादर केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 10 विद्यार्थ्यांनी पीएच.डी., तर 22 विद्यार्थ्यांनी एम.फीलची पदवी प्राप्त केली.

डॉ. गो. मा. पवार यांची पुस्तके

  • विनोद – तत्व व स्वरूप
  • मराठी विनोद – विविध अविष्काररूपे
  • निवडक फिरक्या
  • निवडक मराठी समीक्षा
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे – जीवन व कार्य
  • निवडक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे – भारतीय साहित्याचे निर्माते
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे – समग्र वाङ्‌मय खंड 1 व 2
  • द लाईफ अँड वर्क्स ऑफ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

पुरस्कार

  • साहित्य अकादमी पुरस्कार, नवी दिल्ली
  • महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ठ वाङ्‌मय पुरस्कार
  • महाराष्ट्र फाऊंडेशन मराठी साहित्य पुरस्कार, मुंबई
  • मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, औरंगाबाद
  • भैरू रतन दमाणी पुरस्कार, सोलापूर
  • शिवगिरीजा प्रतिष्ठान पुरस्कार, कुर्डुवाडी
  • रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, वाई
  • पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, प्रवरा नगर
  • धोंडीराम माने साहित्य रत्न पुरस्कार, औरंगाबाद
  • शरद प्रतिष्ठानचा शरद पुरस्कार, सोलापूर
Non Stop LIVE Update
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.