VIDEO : पुण्यातल्या PSI ची सोलापुरात तलवार घेऊन दादागिरी

रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर : पुण्यात पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून कार्यरत असलेल्या दत्तात्रय मदने याची दादागिरी समोर आली आहे. सोलापुरात हातात तलावर फिरवत नागरिकांना दमबाजी करतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीएसआयविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात पीएसआय दत्तात्रय मदने …

VIDEO : पुण्यातल्या PSI ची सोलापुरात तलवार घेऊन दादागिरी

रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर : पुण्यात पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून कार्यरत असलेल्या दत्तात्रय मदने याची दादागिरी समोर आली आहे. सोलापुरात हातात तलावर फिरवत नागरिकांना दमबाजी करतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीएसआयविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात पीएसआय दत्तात्रय मदने यांची दादागिरी समोर आली. दत्तात्रय मदने यांची करमाळ्यातील सावडी येथे शेती आहे. तिथे दत्तात्रय मदने यांनी कॅनॉल फोडून स्वत:च्या शेतात पाणी नेले, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

या प्रकाराबाबत गावकरी पीएसआय दत्तात्रय मदने यांना जाब विचारायला गेले. त्यावेळी त्यांनी तलवार घेऊन नागरिकांना दमबाजी केली. पीएसआय मदने यांनी तलवार काढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं. मदनेंचा हा सर्व प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

कोण आहेत दत्तात्रय मदने?

दत्तात्रय मदने हे पीएसआय म्हणजे पोलिस उपनिरीक्षक आहेत. पुण्यातील कात्रज पोलिस ठाण्यात मदने पीएसआय म्हणून कार्यरत आहेत. मदने यांची सोलापुरातील करमाळा जिल्ह्यातील सावडी येथे शेती आहे.

ज्या पोलिसांच्या हातात नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते, त्यांनीच अशी उघडपणे तलावरी घेऊन गुंडगिरी सुरु केली, तर सर्वसामान्य नागरिकांनी कुणाकडे पाहायचं? शिवाय, आता या पीएसआय दत्तात्रय मदनेवर पोलिस प्रशासन काय कारवाई करतं आहे, हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *