VIDEO : खासदार सुप्रिया सुळेंची तलवारबाजी

  • Namdev Anjana
  • Published On - 12:41 PM, 27 Nov 2018

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात तलवारबाजी केली. हडपसरमध्ये सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्या तलवारबाजीचे कसब पाहायला मिळाले.

हडपसर येथील एस. एम जोशी येथे आयोजित करण्यात आलेल्या सेल्फ डिफेन्सच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती. याच कार्यकर्मात सुप्रिया सुळे यांनी तलवारबाजीचं प्रात्याक्षिक करुन उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला.

तलवार हातात घेऊन स्वत: खासदार सुप्रिया सुळेच रणांगणात उतरल्याने आधीच जमलेल्या गर्दीला आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यात सुप्रिया सुळेंनी थेट तलवारबाजी सुरु केल्याने सगळेच आवाक होऊन बघू लागले. एखाद्या कुशल तलवार चालवणाऱ्यासारखे सुप्रिया सुळेंनी तलवारबाजी केल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

पाहा सुप्रिया सुळेंचा तलवारबाजीचा व्हिडीओ :