विद्रोही साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर; नाशिकमध्ये 4 डिसेंबरपासून आयोजन

अखेर नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या दरम्यानच विद्रोही साहित्य संमेलन घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.

विद्रोही साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर; नाशिकमध्ये 4 डिसेंबरपासून आयोजन
संग्रहित छायाचित्र


नाशिकः अखेर नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या दरम्यानच विद्रोही साहित्य संमेलन घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये 3 ते 5 डिसेंबरमध्ये 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. याच काळात म्हणजे 4 व 5 डिसेंबर रोजी विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत विद्रोही साहित्य संमेलन संयोजन समितीची बैठक टिळक वाचनालय येथे गुलाम भाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. महात्मा फुले यांनी मराठी ग्रंथकार सभेला पाठवलेल्या पत्रातील भूमिकेवर आधारित, दिल्ली शेतकरी आंदोलन समर्थनार्थ आणि केंद्रसत्तेच्या फॅसिझमविरोधात, संविधान सन्मानार्थ 15 वे विद्रोही साहित्य संमेलन 4 व 5 डिसेंबर रोजी नाशिकमध्ये भरवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी संमेलनाच्या तयारीचा आढावाही घेण्यात आला. विविध समिती प्रमुखांनी कामाचा आढावा मांडला. संमेलन यशस्वी करण्यासाठी उपस्थित मान्यवरांनी सूचना केल्या. विद्रोही साहित्य संमेलनासाठी नाशिक मर्चंट बँकेत खाते उघडल्याचे सांगण्यात आले. संमलेनाच्या जागेत स्टॉल्स उभारणीसाठी तीन हजार रुपये शुल्क घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भुजबळ नॉलेज सिटीमध्ये तयारी

94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे 3 ते 5 डिसेंबरमध्ये भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होणार आहे, अशी माहिती सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. यावेळी निमंत्रक डॉ. जयप्रकाश जातेगावकर म्हणाले की, ठाले – पाटील नाराज नाहीत. शिवाय मंगलाताई नारळीकरांच्या प्रकृतीबाबत तक्रारी होत्या. तसे जयंत नारळीकरांनी आपल्याला सांगितले होते. त्यामुळे या संमेलनाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या. आता कोणीही नाराज नाही. सर्व काही व्यवस्थित पार पडेल.

उद्घाटनाला मोठा साहित्यिक

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला एखाद्या मोठ्या साहित्यिकाला बोलावले जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलन भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होईल. त्याची तयारी झाली आहे. लवकरच उद्घाटक ठरतील. त्यानुसार आपल्याला माहिती देण्यात येईल. या संमलेनाला साऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

3 तारखेला दिंडी निघणार

– भुजबळ नॉलेज सिटीमध्ये साहित्य संमेलन
– राहण्याची,पार्किंगची आणि इतर व्यवस्था
– गावात संमेसलन केल्यास वाहतूक कोंडी
– रसिकांसाठी बसेस ची व्यबस्था करणार
– नाशिकमधील सर्व विभागातून गाड्या इथे येतील
– 3 तारखेला दिंडी निघणार
– त्यानंतर ध्वज वंदन आणि उद्घाटन
– 4 तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम

इतर बातम्याः

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; 15 हजारांचे सानुग्रह अनुदान मिळणार

ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाशिक महापालिकेत नोकर भरतीचा बार; आयटी हब, लॉजिस्टिक पार्कसाठी जोर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI