चंद्रपुरात बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या आगप्रकरणी विजय वडेट्टीवार आक्रमक, चौकशीचे आदेश

निकृष्ट दर्जा लपविण्यासाठी कुणी आग लावली की लागली याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा पुनरुच्चारही त्यांनी केलाय.

  • निलेश डाहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर
  • Published On - 23:05 PM, 26 Feb 2021
चंद्रपुरात बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या आगप्रकरणी विजय वडेट्टीवार आक्रमक, चौकशीचे आदेश
Vijay Wadettivar

चंद्रपूरः गेल्या काही दिवसांपासून राज्यात आगीच्या घटना वाढत आहेत. चंद्रपूरच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची इमारत काल लागलेल्या आगीत राख झाली. आज या ठिकाणी चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन स्थितीची पाहणी केली. चंद्रपूरच्या बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र आगीची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी दिलेत. आगीत वनविभागाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अर्ध्या तासात राख झाली होती. मुख्यमंत्र्यांनी आगीची माहिती घेतली असून, त्यांना सर्व तथ्यांसह भेटणार असल्याचे प्रतिपादन विजय वडेट्टीवारांनी दिलंय. एवढ्या मोठ्या प्रकल्पात अग्निशमन यंत्रणा कार्यरत का नव्हती?, असा सवालही विचारण्यात आलाय. निकृष्ट दर्जा लपविण्यासाठी कुणी आग लावली की लागली याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा पुनरुच्चारही त्यांनी केलाय. (Vijay Vadettiwar Aggressive In The Case Of The Fire At The Bamboo )

पालकमंत्री विजय वडेट्टीवारांकडून भेट देऊन स्थितीची पाहणी

चंद्रपूरच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची इमारत काल अग्निकांडात राख झाली. आज या ठिकाणी चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन स्थितीची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. चिचपल्ली येथे ही वास्तू उभारली जात आहे. या संपूर्ण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच उद्घाटन होण्यापूर्वीच या केंद्राला भीषण आग लागली आणि त्यात केंद्राची मुख्य प्रशासकीय इमारत अर्ध्या तासात बेचिराख झाली.

या संपूर्ण घटनेची आणि बांधकामाची चौकशी होणार

हे बांबू केंद्र पूर्णपणे बांबूपासून निर्मित असून, बांबूपासून बनवलेली आशियातील ही सर्वात मोठी इमारत होती. या आगीच्या अनुषंगाने वडेट्टीवार यांनी मागील सरकारच्या कारभारावर गंभीर टीका केली. या बांधकामाला कोणताही दर्जा नाही. बांबूची इमारत असतानाही अग्निसुरक्षा यंत्रणा नाही. त्यामुळे हे कुणाचे पाप झाकण्यासाठी हे कृत्य केले, असा सवाल करीत या संपूर्ण घटनेची आणि बांधकामाची चौकशी करून दोषींना सोडणार नाही, असे ते म्हणाले.

प्रकल्पात अग्निशमन यंत्रणा कार्यरत का नव्हती?

मुख्यमंत्र्यांनी आगीची माहिती घेतली असून, त्यांना सर्व तथ्यांसह भेटणार असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. एवढ्या मोठ्या प्रकल्पात अग्निशमन यंत्रणा कार्यरत का नव्हती? असा सवाल त्यांनी विचारला. निकृष्ट दर्जा लपविण्यासाठी कुणी आग लावली की लागली, याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

संबंधित बातम्या

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, मुंबई लोकलच्या फेऱ्याही कमी करणार, मंत्री विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य

विदर्भात मंगलकार्यालयांवर वॉच, कार्यक्रमांना बंदी, सिनेमागृहे बंद होणार; विजय वडेट्टीवार यांचे संकेत

Vijay Vadettiwar Aggressive In The Case Of The Fire At The Bamboo