विजय वडेट्वीवारांचा राज ठाकरेंवर पलटवार, म्हणाले….

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढीव वीज बिलावरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेला मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केला आहे (Vijay Wadettiwar slams Raj Thackeray).

विजय वडेट्वीवारांचा राज ठाकरेंवर पलटवार, म्हणाले....
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 7:37 PM

बुलडाणा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढीव वीज बिलावरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आधी विज बील कमी करु, असं आश्वासन दिलं. मात्र, उद्योगपती अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आल्यावर सरकारने कोणतंही वीजबिल माफ करणार नाही, अशी भूमिका घेतली, असा दावा राज ठाकरेंनी केला होता. त्यांच्या या टीकेवर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केला आहे (Vijay Wadettiwar slams Raj Thackeray).

“पक्षाचा एक आमदार असलेल्या राज ठाकरेंनी केंद्र सरकारच्या विरोधातही आंदोलन करावे. राज ठाकरे यांनी विज बिल बाबत आरोप-प्रत्यारोप आणि टीका करत असतानाच, त्यांनी विरोधाची भूमिका बजावत असताना सर्वसामान्यांना जो त्रास आज पेट्रोल-डिझेल, खाण्याचे तेल आणि गॅस वाढीमुळे झालेले आहेत त्याचाही विचार करावा. त्यांनी केंद्राच्या विरोधातही आपली भूमिका मांडावी”, अशी उपरोधिक टीका राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली (Vijay Wadettiwar slams Raj Thackeray).

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

“वीज कंपन्यांना फायदा झाला नाही, नफा झाला नाही म्हणून जर सरकार नागरिकांना पिळणार असेल तर कसं होईल? पहिल्यांदा वीज मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही वीज दरात कपात करु. नंतर एकदम घुमजाव झालं. मी राज्यपालांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी शरद पवारांशी बोलून घेण्यास सांगितलं. मी त्यांच्याशी बोललो”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.

“शरद पवार म्हणाले त्या वीज कंपन्यांच्या नावाने पत्र लिहून मला ते पत्र पाठवा. मग त्या कंपन्यांमध्ये अदानी, एमएसईबी असेल किंवा टाटा असेल त्यांच्याशी शरद पवार बोलणार होते. मात्र, 5-6 दिवसांनी असं कळलं की अदानी शरद पवार यांच्या घरी येऊन गेलेत. त्यात चर्चा काय झाली माहिती नाही. त्यानंतर सरकारने वीजबिल माफ करणार नाही असं उत्तर आलं. त्यामुळे पत्रकारांनी मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारणं गरजेचं आहे,” असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.

सरकार आंदोलन केल्यावर आंदोलकांवर गुन्हे दाखल करतंय, वीज बिल माफही करत नाही. लोकांना भरमसाठ वीज बिलं भरण्यास सांगितलं जातंय. हे सगळं कुणासाठी सुरु आहे? असाही सवाल राज ठाकरेंनी केला होता.

हेही वाचा : आधी वीज बिल माफ करु म्हणाले, अदानी शरद पवारांच्या घरी येऊन गेल्यावर नाही म्हणाले : राज ठाकरे

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.