MPSC 2020 ची यादी पुन्हा दुरुस्त करण्याची मागणी मान्य, विनोद पाटील यांचा दावा

विनोद पाटील यांनी 2020ची MPSC ची यादी पुन्हा दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. ती मान्य झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे . (Vinod Patil claim about MPSC result)

MPSC 2020 ची यादी पुन्हा दुरुस्त करण्याची मागणी मान्य, विनोद पाटील यांचा दावा
विनोद पाटील, मराठा नेते
Follow us
| Updated on: Jul 17, 2020 | 2:26 PM

मुंबई : एमपीएससी ( MPSC 2020) ची यादी पुन्हा दुरुस्त करण्याबातच्या मागणीचा विचार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याची माहिती मराठा आरक्षण समन्वयक विनोद पाटील यांनी दिली. विनोद पाटील यांनी 2020ची MPSC ची यादी पुन्हा दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने ही मागणी मान्य केल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला आहे. (Vinod Patil claim about MPSC result)

राज्यसेवा आयोगात 2019 मध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी या पदावरील उमेदवारी निवड पुन्हा 2020 मध्ये झाली आहे. 2019 मधील पात्र उमेदवारांना वगळून पुन्हा नवीन यादी प्रस्तुत करावी, अशी मागणी विनोद पाटील यांनी केली होती. राज्य सरकारने मागणी मान्य करत नवीन यादीबाबत विचार करत असल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला. (Vinod Patil claim about MPSC result)

नेमकी मागणी काय? विनोद पाटील नेमकं काय म्हणाले?

MPSC च्या सन 2019 निकालामध्ये जे पूर्वी अधिकारी होते ते पुन्हा परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांना पूर्वीची पदे मिळाली. यामुळे आमच्या अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. मागील आठवड्यात मी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांना ही गोष्ट लक्षात आणून दिली.

राज्य सरकारने MPSC आयोगाला रिक्त पदे तात्काळ भरण्याचे आदेश दिले पाहिजेत. ज्या विद्यार्थ्यांना दुय्यम दर्जाचे पद मिळाले, अशांना त्यांच्या पात्रतेनुसार क्रमांक एकचा दर्जा द्यावा आणि जे विद्यार्थी या प्रक्रियेतून बाहेर पडले त्यांना नोकरीत समाविष्ट करावे अशी मागणी विनोद पाटील यांनी केली.

तसेच MPSC कडून या घटना वारंवार होत आहेत, ही गोष्ट पुन्हा होऊ नये कारण आमचे विद्यार्थी फार गरिबीतून मेहनतीने शिक्षण घेतात आणि त्यांच्यावरच हा अन्याय होता कामा नये अशी विनंती केली. जे अधिकारी कार्यरत आहेत त्यांनी परीक्षा देण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घेतली पाहिजे.

याबाबत उपमुख्यमंत्री महोदयांनी, “MPSC संदर्भातील त्रुटी दूर करून निवेदनाचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात यावा असे मा.अपर मुख्य सचिव यांना निर्देश दिले, अशी पोस्ट विनोद पाटील यांनी फेसबुकवर केली आहे.

संबंधित बातम्या 

MPSC Toppers | ‘एमपीएससी’ यशोवीरांच्या यशोगाथा   

MPSC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवून द्यावी : सुप्रिया सुळे 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.