अण्णांच्या आदर्श गाव असलेल्या राळेगणसिद्धीतच आचारसंहितेचा भंग; नेमकं काय आहे प्रकरण?

यंदा तर अण्णा हजारेंच्या विचारांनाच हरताळ फासण्यात आलाय.

  • कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर
  • Published On - 19:13 PM, 16 Jan 2021
अण्णांच्या आदर्श गाव असलेल्या राळेगणसिद्धीतच आचारसंहितेचा भंग; नेमकं काय आहे प्रकरण?

अहमदनगरला: आदर्श गाव राळेगणसिद्धी येथे आचार संहितेचा भंग करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय. मतदारांना साड्या वाटप करताना दोघांना पकडण्यात आलंय. त्यामुळेच आचारसंहितेचा भंग झालाय. अहमदनगरला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांचे राळेगणसिद्धी गाव संपूर्ण देशात आदर्श गाव म्हणून ओळखले जातेय. (Violation Code Of Conduct In Ralegan Siddhi Village, What Exactly Is The Case?)

तर गावाचा अभ्यासदौरा करण्यात देशभरातील अनेक मंडळी येतात. अण्णांच्या राळेगणसिद्धीने देशात वेगळी ओळख निर्माण केलीये. दरवर्षी गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत होती. मात्र गेल्या निवडणुकीपासून निवडणूक होत आहे.

अण्णा हजारेंच्या विचारांनाच हरताळ

मात्र यंदा तर अण्णा हजारेंच्या विचारांनाच हरताळ फासण्यात आलाय. चक्क मतदारांना प्रलोभन देण्यासाठी साडी वाटप करण्यात आलेय. सुरेश दगडू पठारे तसेच किसन मारुती पठारे यांना मतदारांना साड्या वाटताना भरारी पथकाने रंगेहाथ पकडलेय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहेय. तर हे कृत्य निंदनीय असल्याचं माजी सरपंच लाभेश औटी यांनी म्हटलंय.

10 लाख रुपयांची कार आणि 27 हजार 200 रुपयांच्या 136 साड्या जप्त

14 तारखेला सायंकाळी ही घटना घडलीये. याप्रकरणी 10 लाख रुपयांची इनोव्हा कार आणि 27 हजार 200 रुपयांच्या 136 साड्या जप्त करण्यात आल्यात. तर महिलांसह 4 जणांविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात आचारसंहितेचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तूर्तास या प्रकरणी अण्णांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केलयी, मात्र अण्णांनी आयुष्यभर एकही कलंक स्वतःवर आणि गावावर लागू दिला नव्हता. तर या प्रकरणामुळे अण्णांना नक्कीच दुःख झाले असणार, यात काही शंका नसल्याचंही सांगितलं जातंय.

14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं. कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्यानं मार्च 2020मध्ये सुमारे 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार 17 मार्च 2020ला स्थगित करण्यात आल्या होत्या.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

प्रभाग – 46,923

जागा – 1,24,819

उमेदवार : अडीच लाखांहून अधिक

संबंधित बातम्या

Special Story : राज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, पण बिघडलेल्या संबंधांचं काय होणार?

महाराष्ट्रातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी मतदान, अडीच लाखांहून अधिक उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद

Violation Code Of Conduct In Ralegan Siddhi Village, What Exactly Is The Case?