महाराष्ट्रातील शेतकरीही भारताचे नागरिक, केंद्राच्या मदतीमध्ये दुजाभाव नको: विश्वजित कदम

महाराष्ट्रातील शेतकरी ही भारताचे नागरिक आहेत, त्यांना केंद्र सरकारने मदत करावी, असं आवाहन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले आहे. (Vishwajeet Kadam appeals to central government should help farmers of Maharashtra)

महाराष्ट्रातील शेतकरीही भारताचे नागरिक, केंद्राच्या मदतीमध्ये दुजाभाव नको: विश्वजित कदम

सागंली: केंद्र सरकरने महाराष्ट्राला मदत करताना भेदभाव करू नये. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रानं पथक पाठवावे. महाराष्ट्रातील शेतकरी ही भारताचे नागरिक आहेत, त्यांना केंद्र सरकारने मदत करावी, असं आवाहन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले आहे. (Vishwajeet Kadam appeals to central government should help farmers of Maharashtra)

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र सरकारवर आरोप करण्याऐवजी, केंद्राने बिहारला मदत देताना, बिहार सरकारकडून प्रस्ताव मिळला होता का हे सांगावे, असा सवाल विश्वजित कदम यांनी विचारला. चंद्रकांत पाटील यांनी खोटे आरोप करण्याऐवजी, समोरामोर येऊन बोलावे, असे आव्हान  कदम यांनी दिले.

महाराष्ट्रात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे 70 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे केल्यानुसार महाराष्ट्रातील 35 लाख हेक्टर शेती बाधित झाली असून यामध्ये आणखी 15 ते 20 लाख हेक्टरची वाढ होऊ शकेल, असे कदम यांनी म्हटले. राज्यात 45 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाले असावे असा आमचा अंदाज आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी राज्य सरकारकडून 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये शेती क्षेत्राला सर्वाधिक मदत करण्यात आलीय.भाजप सरकारच्या काळात दर हेक्टरी 8 हजार रुपये देण्यात आले होते. आम्ही शेतकऱ्यांना 10 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली असल्याचे कदम यांनी सांगितले.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीने आपली वैचारिक लढाई कोणाबरोबर आहे याचे भान ठेवून वागावे, असा सल्ला विश्वजित कदम यांनी दिला आहे. काही दिवसापूर्वी काँग्रेस मधील काही नेत्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता. त्यापार्श्वभूमीवर विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादीला सल्ला दिला आहे.

संबंधित बातम्या :

जो शिशों के घरो मे रहते है… जयंत पाटील-चंद्रकांतदादांच्या वादात विश्वजित कदमांची उडी

विधानसभा 2019 : रॅली आणि मेळावा घेत विश्वजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

(Vishwajeet Kadam appeals to central government should help farmers of Maharashtra)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *