दर तासाला ‘वॉटर ब्रेक’, नोटा मोजताना हॅंड ग्लोज सक्तीचे, नाशिकच्या बँकेचा कोरोना नियंत्रणासाठी पुढाकार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक स्तरावर शक्य ते प्रयत्न केले जात आहेत. अशातच नाशिकच्या विश्वास बॅंकेनंही पुढाकार घेत आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वॉटर ब्रेक सुरु केला आहे (Water break to avoid Corona).

दर तासाला 'वॉटर ब्रेक', नोटा मोजताना हॅंड ग्लोज सक्तीचे, नाशिकच्या बँकेचा कोरोना नियंत्रणासाठी पुढाकार
Follow us
| Updated on: Mar 14, 2020 | 12:01 PM

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक स्तरावर शक्य ते प्रयत्न केले जात आहेत. अशातच नाशिकच्या विश्वास बॅंकेनंही पुढाकार घेत आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वॉटर ब्रेक सुरु केला आहे (Water break to avoid Corona). दररोज नोटांशी आणि ग्राहकांशी संपर्क येत असल्याने विश्सान बॅंकेनं कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, हॅंड ग्लोज आणि मास्क वापरणंही सक्तीचं केलं आहे. कर्मचाऱ्यांना दर एक तासाने 200 मिली पाणी पिण्यासाठी विशेष ‘वॉटर ब्रेक’ देखील देण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रसार हवेतून न होता, तो प्रत्यक्ष स्पर्शाने होणाऱ्या विषाणू संसर्गाने होत आहे. बॅंक म्हटलं की रोजचे पैशांचे व्यवहार आले. तसंच ग्राहकांशी संपर्कही आलाच. यावरच इलाज म्हणून नाशिकच्या विश्वास सहकारी बॅंकेने आपल्या 200 कर्मचाऱ्यांसाठी दर एक तासाने वॉटर ब्रेक सुरु केला आहे. या अंतर्गत प्रत्येक एक तासाने कर्मचाऱ्यांना 200 मिली पाणी पिण्यासाठी ब्रेक दिला जात आहे.

याव्यतिरिक्त प्रत्येक कर्मचाऱ्याला हॅंड सॅनिटायझर, हॅंड ग्लोझ आणि मास्क देखील देण्यात आलं आहे. दररोज शेकडो ग्राहकांशी संपर्कात येणाऱ्या कर्मचांसाठी बॅंकेनं या उपाययोजना केल्या आहेत, अशी माहिती विश्वास बॅंकेचे संचालक विश्वास ठाकूर यांनी याविषयी माहिती दिली.

नाशिक शहरात कोरोना संशयितांची संख्या वाढत असली, तरी आतापर्यंत एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नसल्यानं प्रशासनानं सध्या तरी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, मुंबई, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं जिल्हा प्रशासन सध्या हाय अलर्टवर आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून विश्वास बॅंकेसारख्या संस्था स्वयंस्फुर्तीनं उपाययोजना करताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या:

CoronaVirus : रुग्णांचा कोरोनाशी यशस्वी लढा, भारतात उपचारानंतर 11 जण ठणठणीत बरे

पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव, राज्यातील बाधितांची संख्या 14 वर

Corona cases in India | देशात आतापर्यंत 73 जणांना लागण, कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर

Corona | नागपुरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळला, राज्यातील संख्या 11 वर

घरी ये राजा, तुला आयुष्यभर खाऊ घालेन, ‘कोरोना’च्या भीतीने पुण्यातील लेकाला माऊलीची आर्त हाक

17 दिवसाच्या चिमुरडीने कोरोनाला हरवलं, उपचाराशिवाय बरी

Corona | कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा

Corona | Pandemic म्हणजे नेमकं काय? जगभर पसरलेले दोन ‘पॅनडेमिक’ कोणते?

Water break to avoid Corona

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.