मतदारांनो, पहिल्यांदाच मतदान करत असल्यास मतदान केंद्र nvsp inवर कसे शोधाल?, जाणून घ्या

बऱ्याचदा आपल्या मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या जागांसाठी मतदान होत असतं, परंतु आपल्याला त्यासंदर्भात माहिती नसते. आता पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना त्यांचं नाव आणि मतदान केंद्र nvsp in वर शोधता येणार आहे.

मतदारांनो, पहिल्यांदाच मतदान करत असल्यास मतदान केंद्र nvsp inवर कसे शोधाल?, जाणून घ्या
EVM Machine
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Oct 05, 2021 | 7:34 AM

मुंबईः राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरू झालीय. जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान आणि 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. पण या निवडणुकांसाठी तुम्ही मतदान करू शकता का?, तुमचं मतदार यादीत नाव आहे का? हे जाणून घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा आपल्या मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या जागांसाठी मतदान होत असतं, परंतु आपल्याला त्यासंदर्भात माहिती नसते. आता पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना त्यांचं नाव आणि मतदान केंद्र nvsp in वर शोधता येणार आहे.

🛑मतदारसंघानुसार यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही?

त्यामुळे आजच तुमच्या मतदारसंघानुसार यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही? हे नक्की तपासून पाहा. नाव नसल्यास ते ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने रजिस्टर करण्याची संधी निवडणूक आयोगाने दिलीय. त्यासाठी www.nvsp.in तुम्हांला भेट दिल्यास सर्व माहिती मिळणार आहे. मतदान केंद्रावर गेल्यानंतर तिकडेही तुम्हाला तुमच्या व्होटर आयडीनुसार मतदानाची पावती मिळू शकतो. तसेच पोलिंग बुथवर तुम्हाला तुमचं मतदान केंद्रही सापडू शकते.

🛑नवमतदार आणि मतदार यादीमध्ये नाव कसे शोधाल?

💠 निवडणूक आयोगाच्या www.nvsp.in या वेबसाईटला भेट द्या. 💠 तुम्हाला या वेबसाईटवर पहिल्यांदा ऑनलाईन माध्यमातून काही अपडेट्स करत असाल तर साईन अप करून रजिस्ट्रेशन करावं लागेल. 💠 तुम्ही यापूर्वी अकाऊंट बनवलेले असेल तर केवळ लॉगिन करावं लागेल. 💠 मतदार यादीत तुमचे नाव नसल्यास तुम्ही www.nvsp.in या वेबसाईटवर डाव्या बाजूला असलेल्या Registration for New Electoral या पर्यायावर क्लिक करा. 💠 त्यानंतर नाव, जन्मतारीख, पत्ता, आवश्यक कागदपत्र ऑनलाईन माध्यमातून अपलोड करा. 💠 त्यानंतर तुम्हाला एक ट्रॅकिंग आयडी मिळेल. ज्याद्वारा तुम्ही तुमच्या अर्जाची प्रक्रिया कोणत्या टप्प्यात आहे? हे पाहू शकता.

🛑 6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी

अपील असलेल्या ठिकाणी 29 सप्टेंबर 2021 पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान; तर 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण 144 निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होईल. त्यासाठी कोरोना संदर्भातील आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजून दक्षता घेण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले असल्याचे मदान यांनी सांगितले.

🛑 कोणत्या जिल्हा परिषदेतील किती जागांवर मतदान?

नागपुर जिल्हा परिषदेच्या 16 मतदारसंघांसाठी तर पंचायत समितीच्या 31 मतदारसंघांसाठी उद्या पोटनिवडणूक होत असून प्रशासनाने त्यासाठीची तयारी पूर्ण केलीय, तर धुळे जिल्हा परिषदेच्या 14 गट आणि 28 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडत असून मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. दुसरीकडे पालघर जिल्हा परिषदेच्या 15 तर पंचायत समित्यांच्या 14 जागांसाठी मतदान होणार आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 व पंचायत समितीच्या 27 गणांसाठी  पोट निवडणुकी साठी मतदान होत आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी ही पोटनिवडणूक होतेय.

संबंधित बातम्या

Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti Election 2021: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी यंत्रणा सज्ज, मतदान ते निकाल, सर्व अपडेट एका क्लिकवर

Voters, if you are voting for the first time, find out how to find a polling station on nvsp in?

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें