VIDEO : अमरावतीतल्या भाजप आमदाराच्या कृषी विकास परिषदेत तरुणीचा अश्लील डान्स

अमरावती : शेतकऱ्यांची थट्टा या ना त्या मार्गाने सुरुच असते. आता सत्ताधारी भाजपच्या आमदाराने शेतकऱ्यांसाठीच्या कार्यक्रमात अश्लील नाचगाण्याचे कार्यक्रम आयोजित केल्याचा प्रकार समोर आला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी नुकतीच वरुड येथे शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात तरुणीने अगदी तोकड्या कपड्यात डान्स केला. त्यावरुन आता …

VIDEO : अमरावतीतल्या भाजप आमदाराच्या कृषी विकास परिषदेत तरुणीचा अश्लील डान्स

अमरावती : शेतकऱ्यांची थट्टा या ना त्या मार्गाने सुरुच असते. आता सत्ताधारी भाजपच्या आमदाराने शेतकऱ्यांसाठीच्या कार्यक्रमात अश्लील नाचगाण्याचे कार्यक्रम आयोजित केल्याचा प्रकार समोर आला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी नुकतीच वरुड येथे शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात तरुणीने अगदी तोकड्या कपड्यात डान्स केला. त्यावरुन आता आमदार बोंडेंवर सर्वच स्तरातून टीका सुरु झाली आहे.  केलेला अश्लील डान्स सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

सध्या निवडणूका जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी वरुड येथे भाजप आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी कृषी परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, या कार्यक्रमाच नाचगाण्यांचे कार्यक्रम ठेवून, आमदार बोंडेंनी शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे.

राष्ट्रवादीची टीका

“असंवेदनशीलतेचा कळस. एकीकडे अमरावतीत प्रकल्पग्रस्त शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफली आंदोलन करुन सरकारकडे न्याय मागत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र निर्लज्जपण बिभत्सपणाचे प्रदर्शन करत आहेत. जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा!”, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *