महाराष्ट्रातील या तीन जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अस्तित्व पणाला

मुंबई : एक्झिट पोलमध्ये शिवसेना आणि भाजपला राज्यात 36 ते 40 जागा मिळताना दिसत आहेत. अंतिम निकालामध्ये चित्र स्पष्ट होईलच, पण राज्यातील काही जागा अशा आहेत, जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अस्तित्व पणाला लागलंय. जर इथे पराभव झाला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागणारा तो पराभव असेल. महाराष्ट्रातील तीन जागा हायप्रोफाईल लढती आहेतच, शिवाय राज्यातील पुढील […]

महाराष्ट्रातील या तीन जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अस्तित्व पणाला
Follow us
| Updated on: May 23, 2019 | 7:56 AM

मुंबई : एक्झिट पोलमध्ये शिवसेना आणि भाजपला राज्यात 36 ते 40 जागा मिळताना दिसत आहेत. अंतिम निकालामध्ये चित्र स्पष्ट होईलच, पण राज्यातील काही जागा अशा आहेत, जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अस्तित्व पणाला लागलंय. जर इथे पराभव झाला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागणारा तो पराभव असेल. महाराष्ट्रातील तीन जागा हायप्रोफाईल लढती आहेतच, शिवाय राज्यातील पुढील राजकारणाची दिशाही ठरवणार आहेत.

बारामती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत भाजपने 2014 मध्ये पहिल्यांदाच आव्हान उभं केलं. यावेळीची कांचन कुल यांना उमेदवारी देत भाजपने खेळी खेळली. राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी गावागावात जाऊन प्रचार केला. भाजपनेही पूर्ण ताकद पणाला लावली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे बारामतीत तळ ठोकून होते. बारामतीतून सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत दोन वेळा निवडणूक जिंकली आहे. तिसऱ्या टर्मसाठी बारामतीतही धाकधूक वाढली आहे.

Lok Sabha Results 2019 LIVE : महाराष्ट्रातील निकालाचे अपडेट्स

मावळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून निवडणूक रिंगणात उतरवलंय. अजित पवारांनी या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मावळ मतदारसंघात रायगडमधील उरण, कर्जत आणि पनवेल हे किंमगमेकर विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे पार्थ पवारांची मदार ही रायगड जिल्ह्यातील मतदारसंघावर असेल. कारण, मावळ भागात भाजप आणि शिवसेनेचं वर्चस्व आहे. यावेळी पवार कुटुंबाचा पराभव करणारच असा पण शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केलाय.

Lok sabha Results 2019 : देशभरातील निकालाचे अपडेट्स

नांदेड

महाराष्ट्रात काँग्रेसचा चेहरा असलेले प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही धाकधूक वाढली आहे. कारण, भाजपने नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलंय. अशोक चव्हाणांना प्रचारासाठी जिल्ह्याच्या बाहेरही जाता आलं नव्हतं. अशोक चव्हाणांना नांदेडमध्ये रोखून धरण्यात तर भाजपने यश मिळवलं, पण निकाल काय असेल ते लवकरच स्पष्ट होईल. भाजपकडून इथे प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात ‘या’ 4 मतदारसंघांचा निकाल सर्वात अगोदर लागण्याची शक्यता

आम्हालाही 272 चा आकडा गाठण्याची संधी द्यावी, विरोधक राष्ट्रपतींना विनंती करणार

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.