वर्ध्यातील भाजपचे पहिले खासदार विजयराव मुडे यांचे निधन

भाजपचे माजी खासदार विजयराव मुडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे (Wardha former MP Vijayrao Mude passed away).

वर्ध्यातील भाजपचे पहिले खासदार विजयराव मुडे यांचे निधन

वर्धा : भाजपचे माजी खासदार विजयराव मुडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. विजयराव यांना त्यांच्या आर्वी येथील निवासस्थानी शनिवारी (15 ऑगस्ट) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला (Wardha former MP Vijayrao Mude passed away).

विजयराव मुडे हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं 13 महिन्याचं सरकार असताना वर्ध्यात भाजपचे खासदार होते. त्यापूर्वी ते 1995 मध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार राहिले आहेत. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक लढली होती. विजयराव मुडे हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात सरकारमध्ये निवडून आले होते.

वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे पहिले खासदार म्हणून विजयराव मुडे विजयी झाले होते. विजयराव मुडे यांनी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले. त्यानंतर भाजपच्या माध्यमातून लोककार्य करत कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा जनमानसावर उमटविला.

विजयराव मुंडे यांनी सहकार क्षेत्रात वर्धा नागरी सहकारी बँकेचे संचालक, पूर्ती समूहाचे संचालक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, लोकसभा सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली. जनसामान्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची तळमळ असायची. त्यांचे संघटन कौशल्य वाखाणण्याजोगे होते (Wardha former MP Vijayrao Mude passed away).

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीचे नेते राजू बापू पाटील यांचे निधन, दहा दिवसात कुटुंबातील तिघांना काळाने हिरावले

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *