नवाब मलिक जेलमध्ये असताना त्यांच्या अडचणी वाढवणारी बातमी, कोर्टाचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश

चेतन पाटील, Tv9 मराठी

Updated on: Nov 15, 2022 | 6:05 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जेलमध्ये असताना त्यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक बातमी समोर आलीय.

नवाब मलिक जेलमध्ये असताना त्यांच्या अडचणी वाढवणारी बातमी, कोर्टाचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश
नवाब मलिक

वाशिम : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जेलमध्ये असताना त्यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक बातमी समोर आलीय. नवाब मलिक यांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा, असा आदेश वाशिम कोर्टाने पोलिसांना दिला आहे. एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेप्रकरणी कोर्टाने पोलिसांना नवाब मलिकांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिलाय.

समीर वानखेडे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक केली होती. संबंधित प्रकरण प्रचंड गाजलं होतं. या प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बनाव रचला होता, असाही आरोप करण्यात आला होता.

नवाब मलिकांकडून समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक वेगवेगळे दावे करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यांनी समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक दावे केले होते. त्यांनी समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील जुने फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले होते. त्यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर केला होता.

विशेष म्हणजे नवाब मलिक यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर केला होता. तसेच मलिक यांच्या जातीचे कादगपत्रे समोर आणत त्यांनी खोटे कागदपत्रे सादर करत नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप केला होता.

समीर वानखेडे यांची नेमकी भूमिका काय?

नवाब मलिकांच्या आरोपांमुळे कुटुंबियांची बदनामी झाल्याचा आरोप समीर वानखेडेंनी केलाय.

समीर वानखेडेंनी या प्रकरणी वाशिम सत्र न्यायलयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी नवाब मलिकांविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

हे सुद्धा वाचा

समीर वानखेडे यांच्या तक्रारीनुसार वाशिम सत्र न्यालयाने वाशिम पोलिसांना नवाब मलिकांविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI