उद्धवसाहेब, पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या, वाशिमच्या युवकाचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

तुम्ही आतापर्यंत नोकरीच्या जागा काढल्या नाहीत. त्यामुळे जॉब मिळणे कठीण झाले आहे" अशी खंत वाशिमच्या गजानन राठोडने पत्रात व्यक्त केली आहे. (Washim Man letter Uddhav Thackeray)

उद्धवसाहेब, पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या, वाशिमच्या युवकाचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

वाशिम : मला नोकरी द्या, नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या, अशी मागणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे करण्यात आली आहे. वाशिमच्या गजानन राठोड (Gajanan Rathod) या युवकाने मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे. (Washim Man Gajanan Rathod writes letter to CM Uddhav Thackeray demanding girl for marriage)

“माझं वय 35 वर्ष असून माझं लग्न झालेलं नाही. त्याचं कारण गेल्या 7 वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. पण कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलाला नोकरी नोकरी असावी ही अट असते. पण तुम्ही आतापर्यंत नोकरीच्या जागा काढल्या नाहीत. त्यामुळे जॉब मिळणे कठीण झाले आहे” अशी खंत वाशिमच्या गजानन राठोडने पत्रात व्यक्त केली आहे.

काय आहे पत्रात?

माझे सध्या वय 35 वर्ष झाले असून आजपर्यंत माझे लग्न झालेले नाही. त्याचे कारण असे की मी मागील सात वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. परंतु काही ना काही कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथे मुलगी बघायला जातो, तिथे त्यांची एकच मागणी असते की मुलगा जॉबवर पाहिजे, असे गजाननने लिहिले आहे.

आपण अजून कोणत्याही प्रकारच्या नोकरीच्या जागा काढलेल्या नाहीत. त्यामुळे जॉब मिळणे कठीण आहे. आपण मला एकतर जॉब द्यावा. अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करुन द्यावे, ही नम्र विनंती

याआधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने लिहिलेली पत्र लक्षवेधी ठरली आहेत. कधी चिमुरड्यांनी आपल्या वडिलांना कुटुंबासाठी वेळ देता यावा, म्हणून घातलेली साद डोळ्यात पाणी आणतात, तर काही जणांच्या अजब मागण्या हसता पुरेवाट करतात.

संबंधित बातम्या :

एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, तरुणाचं राज्यपालांना पत्र, बीड ते लालबागचा राजा पायी दंडवत

गडचिरोलीत ‘दारूबंदीला समर्थन देणाऱ्या गावांचा आकडा हजार पार’, ठराव घेऊन थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

(Washim Man Gajanan Rathod writes letter to CM Uddhav Thackeray demanding girl for marriage)

Published On - 7:47 am, Tue, 12 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI