राष्ट्रवादीचे खासदार मधुकर कुकडे सिम्बाच्या रुपात, 'ओ लडकी आँख मारे'वर डान्स

भंडारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार मधुकर कुकडे हे सिम्बाच्या अवतारात पाहायला मिळाले. सिम्बा सिनेमातील ‘ओ लडकी आँख मारे’ या गाण्यावर चक्क खासदार कुकडेंनी डान्स केला. जवळपास 65 वर्ष वयाचे खासदार मधुकर कुकडे हे भंडाऱ्यातील एका ज्युनिअर कॉलेजच्या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी खासदार कुकडे यांनी मुलांसोबत विविध गाण्यांवर ठेका धरला. कुकडे यांच्या या डान्सचा …

राष्ट्रवादीचे खासदार मधुकर कुकडे सिम्बाच्या रुपात, 'ओ लडकी आँख मारे'वर डान्स

भंडारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार मधुकर कुकडे हे सिम्बाच्या अवतारात पाहायला मिळाले. सिम्बा सिनेमातील ‘ओ लडकी आँख मारे’ या गाण्यावर चक्क खासदार कुकडेंनी डान्स केला. जवळपास 65 वर्ष वयाचे खासदार मधुकर कुकडे हे भंडाऱ्यातील एका ज्युनिअर कॉलेजच्या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी खासदार कुकडे यांनी मुलांसोबत विविध गाण्यांवर ठेका धरला. कुकडे यांच्या या डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मधुकर कुकडे हे 2018 मध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत निवडून आले आहेत. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने इथे पोटनिवडणूक झाली होती. त्याआधी 1995 ते 2009 पर्यंत ते विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार होते.

29 डिसेंबरला गोदेगाव तालुक्यातील एका आदिवासी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान खासदार मधुकर कुकडेंनी डान्स केला. मग 5 जानेवारीला मोहाळी तालुक्यातील एका ज्युनिअर कॉलेजच्या कार्यक्रमातही कुकडेंनी पुन्हा आपलं डान्स कौशल्य दाखवलं. हे दोन्ही व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत.

त्यातल्या त्या ‘ओ लडकी आँख मारे’ या गाण्यावरचा डान्स तुफान व्हायरल होत आहे. हे गाणं अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खान यांच्या नुकत्याच आलेल्या सिम्बा या सिनेमातील आहे. या सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

कोण आहेत मधुकर कुकडे?

-मधुकर कुकडे हे भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार आहेत

-नाना पटोले यांनी भाजपचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला, त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत, मधुकर कुकडे विजयी झाले.

-राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांनी पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत पटले यांचा पराभव केला.

-मधुकर कुकडे हे यापूर्वी भाजपाचे आमदार होते. 1995 ते 2009 पर्यंत ते तीन वेळा विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार होते.

-2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *