राज्यात मोठं जलसंकट, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

नागपूर : राज्यात भीषण टंचाईला सामोरे जात असलेल्या नागरिकांना अजुनही पावसाने दिलासा दिलेला नाही. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या धरणांचा पाणीसाठी संपत आला आहे. जलसंपदा विभागाने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील धरणांमध्ये सरासरी केवळ  7 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. विभागनिहाय धरणांच्या जलसाठ्यांचा विचार केला तर औरंगाबाद विभागात भीषण परिस्थिती असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे. औरंगाबादमधील धरणांमध्ये अवघा …

राज्यात मोठं जलसंकट, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

नागपूर : राज्यात भीषण टंचाईला सामोरे जात असलेल्या नागरिकांना अजुनही पावसाने दिलासा दिलेला नाही. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या धरणांचा पाणीसाठी संपत आला आहे. जलसंपदा विभागाने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील धरणांमध्ये सरासरी केवळ  7 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

विभागनिहाय धरणांच्या जलसाठ्यांचा विचार केला तर औरंगाबाद विभागात भीषण परिस्थिती असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे. औरंगाबादमधील धरणांमध्ये अवघा 0.79 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील 6 जिल्ह्याच्या धरणांमध्ये 6 टक्के, अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये 7 टक्के, नाशिक विभागातील धरणांमध्ये 6 टक्के तर पुणे विभागातील धरणांमध्ये 7 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मान्सून लांबणीला पडल्यास या पाचही विभागात मोठं जलसंकट तयार होऊ शकतं. अशास्थितीत राज्यसरकार आणि प्रशासन यावर काय उपाययोजना करणार हा मोठा प्रश्न आहे. पाणी व्यवस्थापन आणि जलसंधारण या पातळीवर राज्यसरकार काम करत असल्याचा दावा नेहमीच करण्यात आला आहे. मात्र, ही स्थिती पाहता त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळत नाही.

कोकणात राज्यातील इतर विभागांपेक्षा वेगळी स्थिती आहे. कोकणाला आपल्या भौगोलिक स्थानाचाही फायदा होत आलेला आहे. यावर्षी कोकणात मुबलक पाणी शिल्लक असून येथील धरणांमध्ये 27 टक्के पाणीसाठी आहे. हा पाणीसाठा कोकणाला मान्सुनच्या आगमनापर्यंत पुरेसा आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणांमध्ये 10 टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. जलसंपदा विभागाच्या या आकडेवारीने नक्कीच चिंता वाढवली वाढवली आहे. मान्सून राज्यात उशीरा दाखल झाल्यास जलसंकट उभं राहणार का असाही प्रश्न त्यामुळे पडत आहे?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *