पाण्याचा वाद टोकाला, महिलांनी थेट शोले स्टाईल आंदोलनच केलं, पाण्याच्या टाकीवर चढल्या आणि दिला इशारा

नाशिकच्या इगतपुरी तालुक्याला धरणांचा तालुका म्हणून सर्वत्र ओळखले जाते, मात्र, येथील गावकऱ्यांची धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती निर्माण झाली आहे.

पाण्याचा वाद टोकाला, महिलांनी थेट शोले स्टाईल आंदोलनच केलं, पाण्याच्या टाकीवर चढल्या आणि दिला इशारा
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 3:24 PM

शैलेश पुरोहित, इगतपुरी (नाशिक) : नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या प्रश्न काही महिन्यांपासून निकाली लागत नाही. त्यामुळे संतप्त मानवेढे आणि पंचक्रोशीतील गावकारींनी आक्रमक होऊन थेट भावली धारणावरून समृद्धीला जाणारे पाणी आणि इतर ठिकाणी जाणारा पाणीपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे पाणीप्रश्नावरून स्थानिक महिला चांगल्याच आक्रमक झाल्या असून पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलनही गावकऱ्यांनी केलं आहे. जो पर्यन्त शहराला पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देण्यात आला आहे. इगतपुरी, घोटी, शहापूर आणि समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी भावली धरणाचे पाणी देण्यात आले आहे. मात्र तहाणलेल्या गावांना पाणी न दिल्याने प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. ग्रामपंचायत पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाल्याने ऐन थंडीत प्रशासनाला घाम फुटला आहे. जलजीवन योजने अंतर्गत मानवेढे येथे पाणीपुरवठा योजनेचे काम बंद आहे. त्यामुळे मानवेढे आणि जांभचीवाडीसह परिसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

नाशिकच्या इगतपुरी तालुक्याला धरणांचा तालुका म्हणून सर्वत्र ओळखले जाते, मात्र, येथील गावकऱ्यांची धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती निर्माण झाली आहे.

मानवेढे गावासह पंचक्रोशीत पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी थेट भावली धरण गाठून इगतपुरी तालुक्यातील शहारासह समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे पाणी गावकऱ्यांनी बंद करून टाकले आहे.

हे सुद्धा वाचा

गावात असलेल्या पंचायतीच्या पाण्याच्या टाकीवर चढून महिलांसह पुढाऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यन्त गावाला पाणी सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

धरणांचा तालुका म्हणून सर्वत्र ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील गावांनाच पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याने गावकऱ्यांचा दिवसेंदिवस संताप व्यक्त होत आहे.

Non Stop LIVE Update
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.