कसं उत्तर द्यायचं ते आम्हाला ठाऊक आहे, पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर शरद पवारांची प्रतिक्रिया

पक्षाने अशी परिस्थिती पहिल्यांदाच पाहिलेली नाही, यापूर्वीही अशी परिस्थिती आली होती. पण या परिस्थितीला कसं उत्तर द्यायचं ते आम्हाला ठाऊक आहे, त्यामुळे कसलीही भीती नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी (Sharad pawar) दिली.

कसं उत्तर द्यायचं ते आम्हाला ठाऊक आहे, पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर शरद पवारांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jul 27, 2019 | 7:30 PM

पुणे : राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने अशी परिस्थिती पहिल्यांदाच पाहिलेली नाही, यापूर्वीही अशी परिस्थिती आली होती. पण या परिस्थितीला कसं उत्तर द्यायचं ते आम्हाला ठाऊक आहे, त्यामुळे कसलीही भीती नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी (Sharad pawar) दिली.

आमदारांच्या पळवापळवीवर शरद पवार म्हणाले, माझ्या दृष्टीने सध्या काही घडत नाही. केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याशिवाय आपलं निवडून येणं शक्य नाही, अशी भीती मनात असणारा वर्गच अस्वस्थ आणि अस्थिर झालाय. तर दुसरीकडे हातात सत्ता आहे ते सत्तेचा गैरवापर करुन अनेकांना ओढून घेत आहेत, असं म्हणत शरद पवारांनी भाजपवरही निशाणा साधलाय.

आयकर विभागाची आणि ईडीची भीती दाखवली जात असल्याचं आमच्या काही नेत्यांनी मला सांगितलं. याचं उदाहरण कोल्हापुरात दिसलं. ते (हसन मुश्रीफ) भाजपात येणार नाही म्हणताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी टाकण्यात आल्या. सत्तेचा गैरवापर सुरु असल्याचं आपल्यासमोर आहे, असंही शरद पवार म्हणाले.

पक्षाचं म्हणायचं तर मला याची थोडीही चिंता वाटत नाही. 1980 मध्ये आमचे 60 लोक निवडून आले. मी 15 दिवस परदेशात होतो, त्यादरम्यान आमचे सर्व लोक फोडले. मी देशात परतलो तेव्हा आमच्याकडे फक्त 6 आमदार शिल्लक होते. पण तेव्हाही मला चिंता नव्हती. कारण त्यानंतरच्या निवडणुकीत जे आम्हाला सोडून गेले, ते पराभूत झाले आणि पुन्हा आमचे 60 आमदार निवडून आले. त्यामुळे हे सर्व आम्ही अनुभवलंय, त्याला कसं उत्तर द्यायचं हे ही आम्हाला ठाऊक आहे आणि पुन्हा पक्ष कसा उभा करायचा याचीही आम्हाला काळजी आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

राष्ट्रवादीला गळती, अनेक नेते भाजपच्या वाटेवर

राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरुच आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यांचे पुत्र आमदार वैभव पिचडही 30 जुलैला भाजपात प्रवेश करणार आहेत. नगर जिल्ह्यातील अकोले येथे पिचड समर्थकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मधुकर पिचड, वैभव पिचड यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. पिचड यांच्या निर्णयासोबत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. शिवाय मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीकडे राजीनामे सुपूर्द केले.

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला रामराम

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. चित्रा वाघ यांनी नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. चित्रा वाघ यांच्यासह इतर काही जण भाजप प्रवेश करणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे काही आमदार आणि चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झालंय.

विदर्भातही राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसमधील गळती सुरुच आहे. मुंबई अध्यक्ष सचिन अहिरयांच्यानंतर आता राष्ट्रवादीला विदर्भात मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मनोहर नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक यांचा शिवसेना प्रवेश जवळपास पक्का मानला जातोय. मनोहर नाईक हे राष्ट्रवादीचे विदर्भातील एकमेव आमदार आहेत. त्यामुळे नाईक घराण्याच्या रुपाने राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.