लॉकडाऊनचा निर्णय मान्य, पण… अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला मोलाचा सल्ला

विशेष म्हणजे नेहमीच ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis)आता लॉकडाऊनचे समर्थन केलेय. maharashtra lockdown Amruta Fadnavis

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:37 PM, 22 Apr 2021
लॉकडाऊनचा निर्णय मान्य, पण... अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला मोलाचा सल्ला
Amruta Fadnavis and uddhav thackeray

मुंबईः महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू झालेत. ब्रेक द चेनच्या निर्बंधांचे (break the chain new rules) आदेश जारी करण्यात आले असून, 22 एप्रिल म्हणजेच आज रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत. तसेच 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात हे कडक निर्बंध राहणार आहे. लॉकडाऊनबाबत राजकीय नेत्यांमध्येही संमिश्र प्रतिक्रिया आहेत. विशेष म्हणजे नेहमीच ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis)आता लॉकडाऊनचे समर्थन केलेय. (We will accept the decision of lockdown in maharashtra, but … Amruta Fadnavis advises Thackeray government)

राज्यात पायाभूत सुविधांचा अभाव आहे

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊनचं समर्थन करताना ठाकरे सरकारला काही सल्लेही दिलेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय, तो मान्य करावाच लागेल. पण राज्यात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, बेडचा अभाव आहे. त्यामुळे त्या सुविधांमध्ये वाढ करून त्या सुधारल्या पाहिजेत, असंही अमृता फडणवीस म्हणाल्यात.

फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना महत्वाचा सल्ला

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीही देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा ठाकरे सरकारला हाच सल्ला दिला होता. लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. तरच रुग्णांची परवड थांबेल”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

‘निधी तत्काळ विनियोग तत्वावर वापरा’

त्याचबरोबर “कोविड प्रतिबंधासाठी जो 3300 कोटी रूपयांचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तो बजेट घोषणेसारखा न ठेवता, तत्काळ बेड्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी, तत्काळ विनियोग तत्त्वावर वापरला गेला पाहिजे. तशी परवानगी सुद्धा राज्य सरकारने दिली पाहिजे”, असंही फडणवीसांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या : 

राज्यात कलम 144 लागू, पुढचे 15 दिवस राज्यात संचारबंदी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra lockdown Update : उद्यापासून 15 दिवस महाराष्ट्रात संचारबंदी, काय सुरु, काय बंद राहणार?

We will accept the decision of lockdown in maharashtra, but … Amruta Fadnavis advises Thackeray government