निवडणूक जिंकण्यासाठी कोरोना लस नाही, महाराष्ट्रातील जनतेला मोफत लस देऊ : नवाब मलिक

बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने मतदारांना कोरोनाची मोफत लस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राजकारण तापले आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी कोरोना लस नाही, महाराष्ट्रातील जनतेला मोफत लस देऊ : नवाब मलिक

औरंगाबादः कोरोना लस भाजप लोकांचे जीव वाचवण्यासाठी देत आहे की निवडणुका जिंकण्यासाठी देत आहे, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. भारतीय जनता पार्टी निवडणूक हरली तरी या देशातल्या लोकांना लस मोफतच मिळणार आहे आणि महाराष्ट्रातील जनतेला ही लस पूर्ण मोफत दिली जाईल, असं स्पष्टच नवाब मलिक यांनी सांगितलं. (nawab malik on corona vaccine)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने मतदारांना कोरोनाची मोफत लस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राजकारण तापले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची मोफत लस देऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे. भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देणे, हे आमचे प्रमुख आश्वासन असल्याचे यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली होती. कोरोनाची लस अजून आली नाही तरीही भाजपकडून त्याचा निवडणूक प्रचारासाठी वापर केला जात आहे. कोरोनाच्या लसीच्या वाटपासंदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्यांना समान वागणूक द्यायला नको का, असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपला विचारला होता.

दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले. सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून त्यांना कोरोनावरील लस देणार नाही का?, केंद्र सरकार गोरगरिबांकडून कोरोना लसीचे पैसे घेणार आहे का?, असे प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचारले होते.

बिहार निवडणुकीसाठी भाजपकडून कोरोना लसीचे राजकारण; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

बिहार विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यातून भाजपने सत्ता आल्यास कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाजपवर टीका केली असून महामारीच्या काळातही भाजपकडून कोरोना लसीचं राजकारण केल्या जात असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

सत्ता दिल्यास मोफत लस देऊ; बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपचं आश्वासन

COVID Vaccine | कोव्हिड लस सर्वात आधी कोणाला मिळणार? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं उत्तर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *